| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ एप्रिल २०२५
एसटी कष्टकरी जनसंघ सांगली विभागाची बैठक शासकीय विश्रामगृह पार पडली. या बैठकी दरम्यान एसटी, कष्टकरी जनसंघाची सन २०२५ या सालाकरिता कर्मचाऱ्यांच्या कामगार प्रश्न विशेष करून चालक वाहक यांना प्रवाशांकडून इतर काही कारणास्तव बाहेरच्या लोकांकडून अनाठाई होत असलेल्या मारहाणी बद्दल कडक सुरक्षतेचा कायदा आणून रा, प खात्यामार्फ त याची अंमलबजावणी व्हावी याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली व तसे निर्णय घेण्यात आले तसेच सन २०२५ ची विभागीय कार्यकारणीच्या निवडी सांगली जिल्ह्यातील एस, टी, कर्मचाऱ्यांचे खंबीर नेतृत्व कर्मचाऱ्यांचे आधारस्तंभ असणारे माजी आमदार नितीनराजे शिंदे व पुणे प्रादेशिक सचिव श्री राजू खैरमोडे यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या.
यामध्ये विभागीय महिला अध्यक्ष म्हणून श्रीमती मिनाताई जाधव तसेच विभागीय सचिव श्री महेश मुकुंद शेळके, विभागीय कार्याध्यक्ष म्हणून माननीय श्री बाबासो बाळासो गुरव. आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी एकमताने करण्यात आल्या.
यावेळी माजी आमदार नितीन राजे शिंदे यांच्या हस्ते निवडी झालेल्या पदाधिकाऱ्यांचे हार घालून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी एस, टी, कष्टकरी जनसंघाचे शिराळा आगारातून *श्री सुरेश देशमुख, श्री विठ्ठल जाधव, श्री प्रकाश खामकर श्री ज्ञानेश्वर सांगळे श्री सुनील बारपटे. सांगली आगारातून श्री रमेश ढमाळ, श्री सतीश सर्जेराव गायकवाड, श्री पितांबर मंडले, सौ मनीषा कांबळे, श्री दिनेश बाळकृष्ण माने, पलूस, श्री प्रशांत आमने, विटा, श्री अभिजीत शिंदे विभागीय वर्कशॉप मिरज,
मिरज आगारातून श्री राजू फकीर, श्री बंडूसिंग राजपूत, श्री शशिकांत जाधव, सौ सुनीता मिसाळ, आदी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.