| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ एप्रिल २०२५
आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी भाजप महाराष्ट्र रेल्वे प्रकोष्ठचे अध्यक्ष श्री कैलास वर्मा यांच्यामार्फत सांगली रेल्वे स्टेशनला देशाच्या विविध भागांशी जोडण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने रेल्वे बोर्डाने सांगली रेल्वे स्टेशनवर ६ लांब पल्ल्याच्या उन्हाळी विषेश एक्सप्रेस गाड्यांचा थांबा मंजूर केला आहे. यातील ३ रेल्वे गाड्यांचे स्वागत सांगली रेल्वे स्टेशनवर रामनवमी, रविवार ता ६ एप्रिल रोजी जल्लोषात होणार आहे.
कोल्हापूर-कटीहार एक्सप्रेस, कट्टीहार-कोल्हापूर एक्सप्रेस, बेंगलोर- भगतकीकोठी एक्सप्रेस, भगतकीकोठी-बंगलोर एक्सप्रेस, बेंगलोर-मुंबई एक्सप्रेस व मुंबई-बेंगलोर एक्सप्रेस अशा 6 साप्ताहिक रेल्वे गाड्या सांगली रेल्वे स्टेशनवर थांबणार आहेत. राम नवमी दिवशी या रेल्वे गाड्यांयांचे सांगली रेल्वे स्टेशनवर भव्य स्वागत आयोजित करण्यात आले आहे. या स्वागत समारंभाला सांगली जिल्ह्यातील तमाम नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा प्रसिद्धी प्रमुख केदार खाडीलकर यांनी केले आहे.
६ नवीन रेल्वे गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा मिळाल्यामुळे बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश गुजरात, राजस्थान व कर्नाटक राज्याशी सांगली जिल्ह्याचा संपर्क भक्कम झाला आहे. लोकांनी सांगली रेल्वे स्टेशन वरून जास्तीत जास्त तिकिटे काढून या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करावा जेणेकरून या साप्ताहिक रेल्वे गाड्यांना दैनंदिन रोज चालवण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे मागणी करता येईल असे आवाहन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केले आहे.
या नवीन रेल्वे गाड्यांमुळे सांगली जिल्ह्यात काम करणारी बिहारचे आमगार, मजूर वर्ग तसेच सांगलीतून गुजरात, राजस्थान व उत्तरप्रदेश, मध्य,प्रदेश, बिहार येथे व्यापार व इतर उद्योग धंद्यानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. सांगली रेल्वे स्टेशनवर थांबणाऱ्या ६ नवीन रेल्वे गाड्यांमुळे सांगलीच्या हळद, गुळ, बेदाणा, सोयाबीन इत्यादी व्यापाराला मोठी चालना मिळेल. देशाची आयटी सॉफ्टवेअर राजधानी बेंगलोर जाण्यासाठी रोज दुपारी ३ वाजता सांगली रेल्वे स्टेशन वरून सांगल-बेंगलोर राणी चेन्नम्मा एक्सप्रेस सुटत आहे. त्याचबरोबर चंडीगड-यशवंतपुर संपर्कक्रांति ही बंगलोर जाणारी गाडी देखील सांगली रेल्वे स्टेशनवर थांबत आहे. त्या व्यतिरिक्त अनेक गाड्या सांगली रेल्वे स्टेशन वरून बेंगलोर जाण्यासाठी उपलब्ध आहेतच. आता बेंगलोर जाणार्या आणखी दोन रेल्वे गाड्या सांगली रेल्वे स्टेशन वरून उपलब्ध झाल्यामुळे सांगली जिल्ह्यातील बेंगलोर येथे काम करणाऱ्या आयटी सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणांची मोठी सोय होणार आहे.
1) सांगली स्टेशनवरून बिहार जाणारी पहिली गाडी. या गाडीचे उद्घाटन आमदार श्री सुधीरदादा गाडगीळ करतील.
गाडी क्र 01405 कोल्हापूर-कटीहार एक्सप्रेस रामनवमी दिवशी
सकाळी १०. ३५ वाजता सांगली स्टेशनवरून रवाना होईल. ही गाडी प्रत्येक रविवारी सांगली रेल्वे स्टेशन वरून सुटून पुणे, कोपरगाव(शिर्डी), मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज चिओकी, मुगलसराय(पं दीनदयाल उपाध्याय जं), पाटलीपुत्र(पटना) हाजीपुर, बरौनी, मार्गे कटिहार पोहोचेल.
परतीच्या प्रवासात प्रत्येक मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता कटीहार-कोल्हापूर एक्सप्रेस गाडी क्र 01406 कटिहार येथून सुटून बरौनी, हाजीपुर, पाटलीपुत्र, पटना, मुगलसराय(पं दीनदयाल उपाध्याय), प्रयागराज चिओकी, सतना, कटनी, जबलपूर इटारसी, भुसावळ, मनमाड, कोपरगाव(शिर्डी), पुणे मार्गे सांगली रेल्वे स्टेशनवर बुधवारी दुपारी पोहोचेल.
2) सांगली स्टेशनवरून मुंबई, गुजरात, राजस्थान जाणारी दुसरी गाडी. या गाडीचे उद्घाटन भाजप महिला अध्यक्षा सौ गीतांजली ताई ढोपे पाटील आणि महिला कार्यकर्त्या करतील.
गाडी क्र 06557 बेंगलोर-भगतकीकोठी(जोधपूर) एक्सप्रेस रामनवमी दिवशी सकाळी ११. १० वाजता सांगली स्टेशनवरून रवाना होईल. ही गाडी प्रत्येक रविवारी सांगली रेल्वे स्टेशन वरून सुटून पुणे, कल्याण(मुंबई), वसई(मुंबई), सुरत, वडोदरा, अहमदाबाद, महेसाणा मार्गे जोधपूरच्या भगतकीकोठी स्टेशनवर पोहोचेल.
परतीच्या प्रवासात जोधपूरच्या भगतकीकोठी रेल्वे स्टेशन वरून प्रत्येक सोमवारी रात्री ११ वाजता भगतकीकोठी-बेंगलोर एक्सप्रेस गाडी क्रमांक 06558 सुटेल. ही गाडी समुदारी, भिलडी, महेसाणा, साबरमती(आमदाबाद), वडोदरा, सुरत, वसई रोड(मुंबई), कल्याण(मुंबई) व पुणे येथे थांबून सांगली रेल्वे स्टेशनवर बुधवार पहाटे २. २५ वाजता पोहोचेल.
3) सांगली स्टेशनवरून मुंबई जाणारी तिसरी गाडी. या गाडीचे उद्घाटन. भाजप जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश ढंग करतील.
गाडी क्र 01014 बेंगलोर-मुंबई एक्सप्रेस रामनवमी दिवशी संध्याकाळी ५. ५० वाजता सांगली स्टेशनवरून रवाना होईल.
ही गाडी प्रत्येक रविवारी संध्याकाळी पावणेसहा वाजता सांगली रेल्वे स्टेशन वरून सुटून पुणे लोणावळा, कल्याण, ठाणे, दादर येथे थांबून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पोहोचेल.
परतीच्या प्रवासात प्रत्येक शनिवारी पहाटे १२. ३० वाजता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सुटून मुंबई-बेंगलोर एक्सप्रेस गाडी क्र 01013 दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे येथे थांबून सांगली रेल्वे स्टेशनवर दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता पोहोचेल.
सांगली शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारची अनोखी रामनवमी सांगली रेल्वे स्टेशनवर साजरी होणार असल्यामुळे भाविकांमध्ये तसेच प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या "सबका साथ सबका विकास" या नाऱ्याचा खरेखर रूपांतर विकास कामांमध्ये होत असून नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. या तीनही गाड्यांच्या स्वागता साठी कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.