| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ एप्रिल २०२५
दिनांक ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस देशभर मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पक्ष सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने शहर जिल्ह्यातील सर्व नऊ मंडला मध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या अंतर्गत सकाळी सात नंतर सर्व कार्यकर्ते, आमदार खासदार, नगरसेवक,प्रमुख पदाधिकारी यांनी आपल्या घरावर भाजपचा झेंडा लावून, झेंड्या बरोबर आपल्या कुटुंबासमवेत फोटो काढून विकसित भारत या बॅनरखाली हे फोटो अपलोड करायचे आहेत.
दुपारी १२ वाजता सर्व मंडला मध्ये प्रमुख नेत्यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होईल.
यामध्ये दिनकर तात्या पाटील, नितीन राजे शिंदे नीताताई केळकर शेखर इनामदार स्वातीताई शिंदे, पृथ्वीराज भैय्या पवार, पांडुरंग कोरे, काकासाहेब धामणे, धनंजय कुलकर्णी हे विविध मंडलात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.
दुपारी एक नंतर कार्याध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा महाराष्ट्रातील सर्व मंडलातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.
या सर्व कार्यक्रमाला शहर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या मंडलामध्ये मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहुल स्थापना दिवस साजरा करावा असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश ढंग यांनी केले आहे.