yuva MAharashtra वृत्तपत्र विक्रेत्यांकडून आ. सुधीरदादा गाडगीळ यांना शुभेच्छा !

वृत्तपत्र विक्रेत्यांकडून आ. सुधीरदादा गाडगीळ यांना शुभेच्छा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ एप्रिल २०२५

वृत्तपत्र विक्रेत्यांसारख्या दुर्लक्षित घटकाला न्याय देणाऱ्या सांगलीचे आमदार सुधिरदादा गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी एक वृत्तपत्र विक्रेता - एक वही उपक्रम राबवला. सांगली, कुपवाड व परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या संख्येइतक्या वह्या शुभेच्छा स्वरूपात आ. गाडगीळांकडे सुपूर्द करून त्यांच्या सामाजिक कार्यास छोटासा हातभार लावण्याचा प्रयत्न वृत्तपत्रविक्रेत्यांनी केला. -

महाराष्टय राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेशी सलग्न असणाऱ्या सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्यावतीने आ. श्री गाडगीळ यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. श्री गाडगीळ यांना शुभेच्छा देताना बुके, फुले या ऐवजी वह्या, शालेय साहित्य द्यावे असे आवाहन आ. गाडगीळ यांच्या कार्यकर्त्यांनी व भाजप पदाधिकाऱ्यांनी केले होते. त्या आवाहनास प्रतिसाद देत वृत्तपत्र विक्रेत्यांनी सांगली विधानसभा क्षेत्रातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या संख्येइतक्या वह्या देत श्री गाडगीळ यांना शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी, राज्य कार्यकारणी सदस्य सचिन चोपडे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय सरगर, माजी राज्य कार्यकारणी सदस्य मारूती नवलाई, जिल्हा सरचिटणीस विशाल रासनकर, मनपा क्षेत्र अध्यक्ष दिपक वाघमारे, शहराध्यक्ष सागर घोरपडे, माजी शहराध्यक्ष नागेश कोरे, कृष्णा जामदार, श्रीकांत दुधाळ, गणेश कटगी, दरिबा बंडगर, श्रीकांत बोंद्रे आदी पदाधिकारी व वृत्तपत्र विक्रेते यावेळी उपस्थित होते.