| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ एप्रिल २०२५
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेस वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे रँकिंग मध्ये प्रथम क्रमांक चे पारितोषिक मिळाले
जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंबई येथे महाराष्ट्र आरोग्य सन्मान २०२५ मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे नियोजन करण्यात आले होते.
उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील सर्व आरोग्य संस्थांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिका विभाग मध्ये सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेस वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे रँकिंग मध्ये प्रथम क्रमांक चे पारितोषिक मिळाले आहे. मा. आरोग्य मंत्री महोदय, श्री प्रकाशराव आबिटकर यांचे हस्ते वरील सर्वांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला
सदर कार्यक्रमास मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा पाटील शहर कार्यक्रम व्यवस्थापक समर पवार सार्वजनिक आरोग्य परिचारिका माधुरी पाटील स्टाफ नर्स,जयश्री संकपाळ, क्षयरोग विभागाच्या सपना देशपांडे,
परिचारिका स्वाती सुतार, आशा शीलवंती सवताळे उपस्थिती होते.