| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.४ एप्रिल २०२५
नागरिक संवाद, तक्रार निवारण प्रभाग निहाय प्रत्येक बुधवार आयोजित करण्यात आला होता , त्या नुसार प्रभाग समिती निहाय चांगला प्रतिसाद मिळाला आहे १५ तक्रारी होत्या ९ तक्रारीबाबत निकाल झाला होता.
दि ३/४/२०२५ रोजी सांगली मुख्यालय येथे तक्रार निवारण , नागरिक संवाद
गुरुवार दुपारी तीन ते पाच या वेळेत मा. आयुक्त रविकांत अडसूळ स्वतः तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख स्थायी समिती हॉल मनपा मुख्य इमारत, सांगली या ठिकाणी उपस्थित नागरिक संवाद तक्रार निवारण मोहीम राबविण्यात आला. साधारणपणे आज ४१ इतक्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत .
विधुत, आरोग्य, पाणी पुरवठा, नगररचना, उद्यान विभाग, शिक्षण कर विभाग, अतिक्रमण, आस्थापना, इत्यादी विभागाशी संबंधित तक्रारी उपस्थितीत करण्यात आला आहेत .
घंटागाडी वेळेत येत नाही, भटकी कुत्री, रस्त्याची स्वच्छता, अपुरा पाणी पुरवठा, शेजारील प्लॉट मध्ये झाडे झुडपे वाढलेली आहेत, लाईट बंद आहेत, शिक्षण विभाग पेन्शन, उपदान बाकी आहे. कर आकारणी बाबत घरकुल मिळणे बाबत अशा आशयाच्या तक्रारी स्वरूप आहे .
तक्रार निवारण अंतर्गत आज महिला वर्गानी सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवला.आज एकूण तक्रारी संख्या ४१ इतकी असून त्या पैकी महिला वर्गानी आज १२ इतक्या तक्रारी केल्या आहेत, जेष्ठ नागरिक यांनी देखील आपली तक्रार नोंदविलेली आहे .
सामाजिक कार्यकर्ते,संस्था NGO यांनी देखील आपला सहभाग नोंदवून काही विकासाभिमुख मागण्या मांडलेला आहेत, त्यामध्ये जेष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र, उद्यानन नव्याने तयार करण्यासाठी नियोजन करावे असे निवेदन दिले आहे.
विभाग प्रमुख यांच्याशी चर्चा करून काही विषय येणाऱ्या गुरुवार पूर्वी निकाली काढण्यासाठी सूचना दिल्या आहेत.
दर बुधवारी प्रभाग निहाय तर प्रत्येक गुरुवारी मुख्यालय सांगली तक्रार निवारण, नागरिक संवाद मोहीम राबविली जाणार आहे. नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.