| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ एप्रिल २०२५
वयाच्या अवघ्या चारव्या वर्षी वडिलांच्या निधनाचे दुःख पचवावे लागले, पण आईने हार मानली नाही. अंगणवाडीत सेविका म्हणून काम करत असलेल्या कविताताईंनी मजुरी आणि टेलरिंगचा आधार घेत मुलाच्या शिक्षणाचा मार्ग सुकर केला. आईच्या संघर्षातून शिकत, आनंद वैजनाथ देशमुख या तरुणाने कठीण परिस्थितीवर मात करत वयाच्या 26 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश बनण्याचे स्वप्न साकारले. ही प्रेरणादायी कथा आहे जत तालुक्यातील कर्नाटक सीमेवरील सोनलगी गावच्या सुपुत्राची.
नुकत्याच पार पडलेल्या ‘न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर’ परीक्षेत आनंदने राज्यात 17 वा क्रमांक पटकावला आहे. आनंदचे वडील वैजनाथ यांचे 2003 मध्ये आजाराने निधन झाले होते. त्यानंतर कुटुंबाचा भार कविता देशमुख यांनी खांद्यावर घेतला. त्यांनी मजुरी आणि शिवणकामाच्या आधारावर आनंदचे शिक्षण सुरू ठेवले.
शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळा सोनलगी येथे घेतल्यानंतर, पुढील शिक्षण एम. व्ही. कॉलेज उमदी येथे पदवीपर्यंत पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच आनंदने अनेक अडच
अंगणवाडी सेविकेच्या मुलाचे न्यायाधीशपदापर्यंतचे प्रेरणादायी यश!
वयाच्या अवघ्या चारव्या वर्षी वडिलांच्या निधनाचे दुःख पचवावे लागले, पण आईने हार मानली नाही. अंगणवाडीत सेविका म्हणून काम करत असलेल्या कविताताईंनी मजुरी आणि टेलरिंगचा आधार घेत मुलाच्या शिक्षणाचा मार्ग सुकर केला. आईच्या संघर्षातून शिकत, आनंद वैजनाथ देशमुख या तरुणाने कठीण परिस्थितीवर मात करत वयाच्या 26 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश बनण्याचे स्वप्न साकारले. ही प्रेरणादायी कथा आहे जत तालुक्यातील कर्नाटक सीमेवरील सोनलगी गावच्या सुपुत्राची.
नुकत्याच पार पडलेल्या ‘न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर’ परीक्षेत आनंदने राज्यात 17 वा क्रमांक पटकावला आहे. आनंदचे वडील वैजनाथ यांचे 2003 मध्ये आजाराने निधन झाले होते. त्यानंतर कुटुंबाचा भार कविता देशमुख यांनी खांद्यावर घेतला. त्यांनी मजुरी आणि शिवणकामाच्या आधारावर आनंदचे शिक्षण सुरू ठेवले.
शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळा सोनलगी येथे घेतल्यानंतर, पुढील शिक्षण एम. व्ही. कॉलेज उमदी येथे पदवीपर्यंत पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच आनंदने अनेक अडचणींना तोंड देत हे यश संपादन केले आहे.