| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.४ एप्रिल २०२५
"स्वच्छता हीच सेवा" या अभियानांतर्गत सांगली मिरज येथील सर्व विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मार्फत स्वच्छता करुन घेण्याचा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्या बाबत नियोजन आरोग्य विभागाने मा रविकांत अडसूळ आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली केले आहे.
सकाळी ७ ते १० वेळेत, साधारणपणे १२०० कर्मचारी, अधिकारी यांच्या सहभागाने स्वच्छता हीच सेवा" या अभियानांतर्गत स्वच्छता महा मोहीम राबविण्यात आली आहे. मनपा कार्यक्षेत्रातील सांगली मिरज रोड वरील साधारणपणे ११ ठिकाणी दुर्लक्षित व अस्वच्छ ठिकाणाची निवड केली आहेत. यामध्ये सांगली सरकारी घाट, स्वामी समर्थ घाट, विष्णु घाट, भाजी मंडई, दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, कुपवाड येथील स्वामी मळा स्मशानभूमी, मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृह, गाडवे चौक परिसर, श्री लक्ष्मी मार्केट इत्यादी परिसराचा समावेश करण्यात आलेला आहे.
आज साधारपणे ४.५ टन कचरा उचलण्यात आला असल्याची माहिती मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ रवींद्र ताटे, निरीक्षक अनिल पाटील, याकूब मद्रासी यांनी दिली. वरील परिसर स्वच्छतेसाठी आज दि ५/४/२०२५ रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत उप आयुक्त विजया यादव, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, मालमता अधीक्षक धनंजय हर्षद, सहदेव कावडे, अनिस मुल्ला मनपा कर्मचारी अधिकारी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, संस्था उपस्थित होते.