yuva MAharashtra आयुष्यमान आरोग्य मंदिराचे आ.सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते उद्घाटन !

आयुष्यमान आरोग्य मंदिराचे आ.सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते उद्घाटन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.४ एप्रिल २०२५

आयुष्यमान आरोग्य मंदिराचे वॉर्ड क्रमांक १७ मोती चौक येथे आज आ. धनंजय ऊर्फ सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते व महापालिका प्र. आयुक्त रविकांत अडसूळ आयुक्त यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ऋतुजा पाटील यांनी केले. सर्वांचे स्वागत व प्रस्ताविक डॉ. वैभव पाटील यांनी केले.

मा. आ. श्री. धनंजय उर्फ सुधीर गाडगीळ, मा. खा. विशाल पाटील, मा. आ. इद्रीस नायकवड़ी, मा.आ. सुरेश खाडे, मा. रविकांत आडसुळ, मा. निलेश देशमुख, श्रीमती शिल्पा दोरकर आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी आयुष्यमान आरोग्य मंदिर ची प्रसिद्धी विविध प्रसार माध्यमातून कशा प्रकारे करता येईल या बाबत मार्गदर्शन केले. आयुक्त रविकांत अडसूळ यांनी आयुष्यमान आरोग्य मंदिर च्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याबाबत या वेळी सबधितांना सूचना दिल्या.

सदर कार्यक्रमासाठी उपायुक्त स्मृती पाटील, डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. ताटे, डॉ. अलका तोडकर, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी महापौर गीता सुतार, माजी नगरसेवक श्री. लक्ष्मणराव नवले. श्री. राहुल ढोपे पाटील, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, डॉ. छाया हंकारे, डॉ. वर्षा पाटील, डॉ. शबाना लांडगे, डॉ. शीतलं व पृथ्वीराज धनवडे, डॉ. धेंडे, डॉ. ऐश्वर्या शिंदे तसेच वैद्यकीय अधिकारी, स्टाफ, आशा वर्कर, कर्मचारी नागरिक उपस्थित होते.