| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ एप्रिल २०२५
सांगली :- कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सांगलीस मार्च २०२५ अखेर रु. २६ कोटी ६४ लाखाचा नफा झाल्याचे व संस्थेने ठेवी, कर्जाचे उद्दीष्ट पुर्ण केल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी दिली.
संस्थेच्या मार्च २०२५ अखेर प्रगती दर्शक आकडेवारीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आर्थिक वर्षात संस्थेने रु.२२०० कोटी व्यवसायाचा टप्पा पुर्ण करुन उत्तम कामकाज केले आहे. आर्थिक वर्ष अखेर संस्थेच्या ठेवी रु.१२४६ कोटी झाल्या असून ठेवीत रु.१५५ कोटीने वाढ झाली. संस्थेने रु.९५३ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेने केलेली बँक गुंतवणूक रु.४१६ कोटी इतकी भक्कम आहे. ढोबळ नफयातून १० कोटी ७५ लाखाची रक्कम निरनिराळया निधीकडे वर्ग करण्यात आली. त्यामुळे संस्थेचा स्वनिधी भक्कम झाला आहे. संस्थेच्या वसुल भागभांडवलात रु. ८ कोटीने वाढ होवून ते रु.४३ कोटीहुन जास्त झाले आहे. संस्थेचा स्वनिधी १३१ कोटी झाला आहे. संस्थेची सभासद संख्या ६७६८३ इतकी आहे. तरतुदीनंतर संस्थेला रु. १५ कोटी ८९ लाख इतका निव्वळ नफा शिल्लक राहिला आहे. निव्वळ नफयातून देखील निधीसाठी तरतुद होवून संस्थेचा स्वनिधी भक्कम होणार असल्याची माहिती चेअरमन यांनी दिली.
संस्थेचे निव्वळ एन.पी.ए. चे प्रमाण १.९० टक्के इतके अल्प राहिले आहे. ऊस बिले तसेच अन्य बीले येण्यास विलंब होऊन देखील वसुलीसाठी कर्जदार सभासदांनी चांगले सहकार्य केले. आर्थिक वर्षात सभासद ठेवीदार, कर्जदार यांनी अतिशय चांगले सहकार्य केले त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. संस्थेच्या प्रगतीमध्ये संस्थेचे व्हा. चेअरमन, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सेवक यांचे पुर्ण योगदान मिळाल्याने चेअरमन यांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे, संचालक अॅड. एस.पी. मगदूम, डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. ओ. के. चौगुले (नाना), श्री. वसंतराव धूळाप्पाण्णा नवले. डॉ. एस.बी. पाटील (मोटके) डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील संचालिका श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, सौ. चंदन नरेंद्र केटकाळे तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे श्री. लालासोो भाऊसाो थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांच्या सह संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.