yuva MAharashtra आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांची शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसीला सदिच्छा भेट

आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांची शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसीला सदिच्छा भेट


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.४ एप्रिल २०२५

तीर्थंकर एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसीला नुकतीच माजी आरोग्यमंत्री, लोकप्रिय आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती घेतली. संस्थेचे संचालक मंडळ व एम. फार्मसी विद्यार्थी आणि पीएचडी प्राध्यापकांसोबत त्यांनी चर्चा केली. कॉलेजच्या वतीने संशोधित "स्मृतीभंश" आणि "व्हेरिकोज व्हेन्स" वरील औषध व त्याविषयी दाखल केलेल्या पेटंटविषयी त्यांनी माहिती घेतली. डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी संस्थेच्या गुणवत्तापूर्ण कार्याचे कौतुक करत, शरद शिक्षण समूहाच्या वतीने सुरू होणाऱ्या फार्मसी कॉलेजच्या उभारणीसाठी या महत्त्वपूर्ण माहितीचा उपयोग होईल, असे सांगितले.

या प्रसंगी तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. रावसाहेब पाटील यांनी आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांचा सत्कार केला. त्यांनी आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी आरोग्य मंत्री म्हणून केलेल्या धडाडीच्या कार्याचा गौरव करत, ते नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी तत्पर असल्याचे आणि कोणत्याही सामाजिक कामात त्यांची सहकार्य करण्याबाबत असलेल्या प्रवृत्तीचे विशेष कौतुक केले

संस्थेचे संस्थापक डॉ. डीडी चौगुले यांनी कॉलेजची स्थापना कशी केलीआणि गुणवत्ता वृद्धीविषयी माहिती दिली. त्यांनी संस्थेतील प्राध्यापक एम. फार्मसी, पीएचडी उच्चशिक्षित आणि संशोधन क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षणामुळे ही संस्था नावारूपाला आल्याचे सांगितले.

यावेळी श्री राजेंद्र झेले यांचा सत्कार संस्थेचे सेक्रेटरी श्री अजित प्रसाद पाटील यांनी केला

यावेळी संस्थेचे संचालक श्री. महावीर चौगुले, डॉ. बाळासाहेब चोपडे, पोपटलाल डोरले, नितीन चौगुले, श्री मिलिंद भिलवडे, प्रशांत अवधूत, अजित फराटे, प्राचार्य किरण वाडकर, श्री. शिरोटे सर आणि सर्व प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.