yuva MAharashtra जैन समाजाला लागलेल्या व्याधींची चिकित्सा करावी लागेल - प्रकाश मगदूम

जैन समाजाला लागलेल्या व्याधींची चिकित्सा करावी लागेल - प्रकाश मगदूम


| सांगली समाचार वृत्त |
जयसिंगपूर - दि.३ एप्रिल २०२५

जैन संस्काराची आणि विचारांची शिदोरी घेऊन देशभर फिरताना अनेक समाजाचा अभ्यास करता आला. भौतिक प्रगती म्हणजे समाजाची प्रगती नव्हे. जैन समाजाच्या प्रगतीची चिकित्सा करताना जैन समाजाला लागलेल्या व्याधींची चिकित्सा करावी लागेल. सध्य परिस्थितीत जैन समाजावर आत्मपरीक्षणाची वेळ आलेली आहे. समाजातील समस्या दूर करण्याची त्याच्या अंमलबजावणी करण्याची वेळ आलेली हे असे उदगार गुजरात माहिती व प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त महासंचालक माननीय प्रकाश मगदूम यांनी काढले. 

वक्ते प्रकाश मगदूम मार्गदर्शन करताना, सोबत द.भा. जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, डॉ. महावीर अक्कोळे, अरविंद मजलेकर, आर्कि. प्रमोद चौगुले, नीलम माणगावे व गोमटेश्वर पाटील आदि मान्यवर होते.

भारत जैनसभेचे मुखपत्र असलेल्या 'प्रगती आणि जिनविजय' या नियतकालिकाच्या १२० व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ते बोलत होते. सहकारमहर्षि शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहामध्ये संपन्न झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी द. भा. जैन सभेचे अध्यक्ष माननीय भालचंद्र पाटील होते.

जैन समाजाकडे पैसा असला तरी त्या समाजाकडे ज्ञानाची पण एक परंपरा आहे समाजाचे ज्ञान आणि पैसा उपयोग यासाठी जैन समाजाला कालबद्ध कार्यक्रम आखायला हवा जैन समृद्ध परंपरेचा वारसा जतन करणे जैन साहित्य आणि संस्कृतीचे जतन संवर्धन करणे ही उद्दिष्टे प्रगती आणि जिनविजय ने ठरवायला हवीत.

समारंभाचे अध्यक्ष माननीय भालचंद्र पाटील म्हणाले, भिलवडी या गावाला विद्वानांची मोठी परंपरा आहे त्यातीलच एक विद्वान म्हणजे प्रकाश मगदूम आहेत दक्षिण भारत जैन सभेने प्रगती आणि दिनविजय या नियतकालिकेचे रूप पालटण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून सध्या कन्नड भाषेतही याची आवृत्ती निघत आहे. जैन समाज बदलण्यासाठी प्रयत्नशील आहे. समाजातील गरजू गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना सभेने आजपर्यंत मोठे सहकार्य केले आहे आज पर्यंत सर्वात अधिक कर भरणारा जैन समाज या गैरसमजतून जैन समाजाने आता बाहेर पडावे लागेल आणि सध्याचे वास्तव लक्षात घेऊन समाजाने पावले उचलायला हवेत असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी द. भा. जैन सभेचे सहखजिनदार अरविंद मजलेकर, माजी सहखजिनदार पा.पा. पाटील, एक्झि. ट्रस्टी राजू झेले, महामंत्री दादासाहेब पाटील-चिंचवाडकर, माजी केंद्रीय उपाध्यक्ष प्रा.डी.ए.पाटील, माजी चेअरमन सागर चौगुले, महिला परिषदेच्या चेअरमन सौ. स्वरूपा पाटील-यड्रावकर, माजी सहसंपादक वि.दा. आवटी, विमल पाटील, स्नेहा चौगुले यांच्यासह जयसिंगपूर व परिसरातील श्रोतावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. जिनेंद्र बुबनाळे, सुरेश सांगावे, सुरेश फराटे, किरण मगदूम, अक्षय पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.