yuva MAharashtra सांगलीत आज ‘इथे ओशाळला मृत्यू’ नाटकाचा मोफत प्रयोग

सांगलीत आज ‘इथे ओशाळला मृत्यू’ नाटकाचा मोफत प्रयोग


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ मार्च २०२५

आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचचा विशेष उपक्रम

सांगली, दि. ३० (प्रतिनिधी) – प्रख्यात नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या लेखणीतून साकारलेले ऐतिहासिक नाटक ‘इथे ओशाळला मृत्यू’ याचा विनामूल्य प्रयोग सांगलीत आयोजित करण्यात आला आहे. आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंच (सांगली) यांच्या वतीने हा विशेष उपक्रम राबवण्यात येत असून, शिव गणेश प्रोडक्शन (सिंधुदुर्ग, मुंबई) याच्या सहकार्याने हा प्रयोग सादर केला जाणार आहे.

हा प्रयोग सोमवार, ३१ मार्च २०२५ रोजी रात्री ८:३० वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह, सांगली येथे संपन्न होईल.

छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमावर आधारित हे नाटक मराठी रंगभूमीवरील एक ऐतिहासिक कलाकृती म्हणून ओळखले जाते. सांगलीतील रसिक प्रेक्षकांसाठी या नाटकाचा मोफत आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या प्रयोगासाठी मोफत प्रवेशिका उपलब्ध असून, रसिकांनी आमदार सुधीरदादा गाडगीळ जनसंपर्क कार्यालय, विश्रामबाग, सांगली येथे संपर्क साधून प्रवेशिका प्राप्त कराव्यात, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.