| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ मार्च २०२५
मराठी पत्रकार परिषदेची संलग्न असणाऱ्या सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ व डिजिटल मीडिया परिषदेची सभासद नोंदणी संदर्भात दिनांक 27 मार्च रोजी सर्किट हाऊस मध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
परिषदेच्या आदेशानुसार सदस्यांची नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली असून, 5 एप्रिल अखेर ही नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी वार्षिक वर्गणी भरून नोंदणी करून, लवकरात लवकर जिल्ह्यातील पत्रकारांनी या सदस्य नोंदणीस भरभरून प्रतिसाद द्यावा. असे अवाहन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष शिवराज काटकर यांनी केले आहे.
दरम्यान नोंदणी झालेल्या पत्रकारांची यादी परिषदेकडे पाठवून ती मंजूर करून घेण्यात येणार असल्याचेही काटकर यांनी म्हटले आहे. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव चंद्रकांत क्षीरसागर, जिल्हा पत्रकार संघाचे सचिव प्रवीण शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश मानस, डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्यकारणी सदस्य तानाजीराजे जाधव, डिजिटल मीडिया परिषदेचे सांगली जिल्हा अध्यक्ष कुलदीप देवकुळे, डिजिटल मीडिया परिषदेचे कार्याध्यक्ष मोहन राजमाने, जिल्हा सरचिटणीस प्रकाश सूर्यवंशी, डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष अक्रम शेख, जिल्हा उपाध्यक्ष मोहसिन मुजावर, जिल्हा चिटणीस नासिर सय्यद आदी पदाधिकारी उपस्थित होते.