| सांगली समाचार वृत्त |
रत्नागिरी - दि. ४ फेब्रुवारी २०२५
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने राज्यातील केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांची सर्वपक्षीय समिती स्थापन केली आहे. या समितीत सांगलीचे खासदार विशाल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचे उद्दिष्ट केंद्र आणि राज्य सरकारांच्या यंत्रणांमध्ये समन्वय साधून ग्रामीण विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आहे.
समितीचे सदस्य पुढीलप्रमाणे आहेत:
उदयनराजे भोसले
श्रीमंत शाहू छत्रपती
विशाल पाटील
सुप्रिया सुळे
अरविंद सावंत
प्रफुल्ल पटेल
रामदास आठवले
सुनील तटकरे
डॉ. भागवत कराड
श्रीरंग बारणे
विशाल पाटील यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. विशाल पाटील यांचा दृष्टिकोन आणि सर्वसमावेशक काम यामुळे त्यांच्या नियुक्तीने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.