| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ३ फेब्रुवारी २०२५
सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघातून मला निवडून आणण्यासाठी माझ्या लाडक्या बहिणी व माझे लाडके भाऊ तसेच या भागातील मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले आहे. त्यांच्या विश्वासाला कुठे तडा लावून देणार नाही. रुक्मिणीनगर व शामरावनगर या परिसरातील विकास कामे करून भागाचा कायापालट करणार असे आश्वासन नूतन आमदार सुधीर गाडगीळ यांनी बोलताना दिले.
सांगलीतील रुक्मिणीनगरमध्ये श्री गणेश जयंती निमित्त श्री समर्थ कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व नवरात्रोत्सव मंडळ यांच्यावतीने सांगली विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार पदी निवडून आल्याबद्दल आमदार सुधीर गाडगीळ यांचा नागरी सत्कार माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी आमदार सुधीर गाडगीळ बोलत होते. यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, स्वाती शिंदे, गीतांजली टोपे पाटील, राहुल टोपे, संदीप दळवी, राहुल नलावडे, आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद उर्फ राजू नलवडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमात मुख्य आकर्षक म्हणून हरियाणातील सुप्रसिद्ध अघोरी नृत्य आयोजित करण्यात आले होते. हे नृत्य पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी मंडळाच्या वतीने गणेश जयंती निमित्त महाआरती करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अंदाजे ४ हजार हून अधिक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.