yuva MAharashtra यंदा प्रशासन, नागरिक, सामाजिक संस्था यांच्या सहभागातून महापूर नियंत्रणासाठी सुयोग्य नियोजन करणार - श्री. शुभम गुप्ता !

यंदा प्रशासन, नागरिक, सामाजिक संस्था यांच्या सहभागातून महापूर नियंत्रणासाठी सुयोग्य नियोजन करणार - श्री. शुभम गुप्ता !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ फेब्रुवारी २०२५

गेल्या काही वर्षांत मध्ये कृष्णा नदीला आलेले महापूर आणि महापालिका क्षेत्रातील नागरी वस्त्यांमध्ये शिरलेले पुराचे पाणी त्या नंतर करावयाची व्यवस्था याबाबत प्रशासनाने बराच गोष्टींचा अभ्यास करून काही निकष काढले आहेत, पूर कालावधी मध्ये नियोजनासाठी कमी वेळ मिळतो. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते, परिणामी प्रशासननावर ताण पडतो. ही बाब लक्ष्यात घेता, या वेळी मान्सूनपूर्व तयारी लवकरात लवकर सुरू करून सर्व बाबीची नोंद घेऊन नियोजन करण्यात येणार आहे, कोणत्याही परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज असणार आहे, असे प्रतिपादन सांगली मिरज व कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

आपत्ती मित्र अँप, आपत्ती मित्र कार्यकर्ते, निवारा केंद्र, स्थळातरीत नागरिकाच्या सोयी सुविधा, नाले सफाई इत्यादी बाबींबाबत यावेळी लवकरात लवकर नियोजन करण्यात येणार आहे. जेणे करून पुढील काळात नियोजन नुसार कामकाज करते वेळी प्रशासनावर ताण येणार नाही.

आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सर्व बाबी विचारपूर्वक होऊन नागरिकांच्या वित्त आणि जीवित हानी होणार नाही, परिस्थिती हाताळताना काळजी घेता येईल, खबरदारी घेता येईल.

मागील अनुभव पाहता पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांसाठी सुरक्षित किट (बॅग) तयार ठेवण्याची सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये आवश्यक सर्व मौल्यवान वस्तू, साहित्य कागदपत्रे, औषध इत्यादी बाबीचा समावेश केला होता, त्याच्या उपयोग नागरिकांना झालेला होता. या वेळी देखील त्या बाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यात येणार आहे,


पूर ओसरल्यावर करावयाच्या कामा बाबत टप्प्याटप्प्याने करावयाच्या कामा बाबत नियोजन करण्यात येणार आहे, sop तयार असल्याने या वेळी कोणत्याही परिस्थितीत कामकाज चागले आणि दर्जेदार करण्याकडे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहेत, साथीचे रोग अन्य आजार उद्भवतात त्या वर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.आवश्यक त्या उपाययोजना सह टीम तयार ठेवण्यात येणार आहेत.

मा आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली तत्परतेने कामकाज करण्यासाठी टीम असणार आहे, सामाजिक कार्यकर्ते ,संस्था, NGO यांच्याशी संवाद आणि संपर्क साधून या वेळी त्यांच्या सहभागातून नदी पात्रातील व पुरबाधित होणाऱ्या वस्त्या मधील नागरिकांची जनजागृती करण्याकडे प्राध्यान असणार आहे, पूर आल्यानंतर लोकांच्या मध्ये होणारी भीती आणि त्या नंतर होणारी धावपळ कमी कशी करावयाची या कडे मान्सूनपूर्व काळातच जागृती निर्माण करण्यात येणार आहे,

आपत्ती व्यवस्थापन कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवणे त्या साठी मनुष्यबळ उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सर्व साधनसामग्री अध्यवत ठेवणे ,मनुष्यबळ प्रशिक्षित आणि सज्ज ठेवणे इत्यादी गोष्टी या वेळी नियोजनपूर्वक करण्यात येणार आहे,

नदीकाठावरील नागरिकांना आवश्यक त्या सूचना ,प्रशिक्षण आणि आपल्या जीविताचे, मालमतेचे आणि साधनसामग्रीचे रक्षणासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे, प्रसार माध्यम आणि व्हाट्सअप्प इत्यादी व्दारे अद्ययावत माहिती दिली जाणार आहे. सध्यस्थितीबाबत माहिती आणि सूचना यावेळेत दिल्या जाणार असल्याने नागरिक सतर्क आणि जागृत राहतील याकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
यावेळी पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व प्रकारची आवश्यक माहिती नागरिकांना देऊन, नागरिक, कर्मचारी अधिकार यांना प्रशिक्षण देऊन, सर्व बाबींबाबत नियोजन करण्यात येणार आहे, असेही आयुक्त श्री. शुभम गुप्ता यांनी या पत्रकात नमूद केले आहे.