| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ फेब्रुवारी २०२५
सांगली पोलिसांनी विटा येथील एक मोठा एमडी ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केला असून असून, २९ कोटी ७५ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून, त्यात ड्रग्ज बनवणारा, पुरवठा करणारा आणि आर्थिक मदत करणारा यांचा समावेश आहे.
२८ जानेवारीला सांगली पोलिसांनी विटा एमआयडीसीमधील माऊली इंडस्ट्रीजमध्ये छापा टाकला. इथे एक अवैध एमडी ड्रग्ज कारखाना कार्यरत होता. पोलिसांनी कारखाना उधळून पावणेतीस कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आणि तीन आरोपींना अटक केली. यामध्ये मुंबई आणि गुजरात कनेक्शन समोर आले असून तपास सुरू आहे.
नवे अटकेतील तीन आरोपी, जितेंद्र परमार, सरदार पाटील आणि अब्दुल रज्जाक शेख, वेगवेगळ्या भूमिका पार करत होते. जितेंद्र परमार हा रायगडच्या अलिबागचा असून त्याने कारखान्याच्या यंत्रसामग्रीसाठी आर्थिक मदत केली. सरदार पाटील, जो सांगलीच्या वाळव्यातून आहे, ड्रग्ज बनवण्याचे काम करत होता. अब्दुल रज्जाक शेख, मुंबईचा रहिवासी, ड्रग्ज सप्लाय करत होता.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या प्रकरणी सहा जणांची साखळी दिसून आली आहे, आणि गुजरातच्या वापीमधून ड्रग्ज निर्मितीसाठी कच्चा माल आणला जात होता. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती दिली.