| सांगली समाचार वृत्त |
कडेगाव - दि. ६ फेब्रुवारी २०२५
जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली कडेगाव तालुका काँग्रेस सेवा दल प्रत्येक गावामध्ये सेवा दलाची स्थापना करण्यात येईल असे प्रतिपादन सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी आपल्या कडेगाव तालुका काँग्रेस सेवा दलाच्या बैठकीत बोलत असताना केले सदर बैठकीमध्ये कडेगाव तालुका काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष म्हणून शाळगावचे अजित करांडे यांची निवड करण्यात आली.
यानिमित्त त्यांचा सत्कार सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष व कडेगाव तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश घारगे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी सुरेश घारगे यांनी सांगितले की, कडेगाव तालुक्यामध्ये जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या आदेशानुसार प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी रवी मिलन कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे, तसेच सेवा दल महिला सेवा दल यंग ब्रिगेड या संघटनाही सक्षम करण्यात येणार आहेत. माजी मंत्री विश्वजीत कदम, ज्येष्ठ नेते मोहनरावजी कदम, तालुक्याचे नेते शांताराम बापू कदम, युवा नेते जितेश भैया कदम यांच्या सहकार्याने कडेगाव तालुक्यामध्ये काँग्रेस सेवा दल अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करून दाखवेल असा मला ठाम विश्वास वाटतो.
यावेळी सचिव संजय जाधव, हनमंत मोहिते, हनुमंत लाड, अधिकराव वेताळ, अधिकराव इंगळे, महिलां सेवादलच्या तालुकाध्यक्ष नयना शिंदे, जिल्हा महिला सेवा दलाच्या अध्यक्ष प्रमिला महाडिक, मनीषा कांबळे, योगिता यादव, पल्लवी गायकवाड, भारती रुपनर, निता सूर्यवंशी इत्यादी तालुका पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.