| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ६ फेब्रुवारी २०२५
भारतीय जैन कासार समाज संघटना सांगली चे संस्थापक अध्यक्ष श्री. पोपटलाल डोरले यांच्या हस्ते सांगली येथे 02 फेब्रुवारी 2025 रोजी सांगली जिल्हा जैन कासार समाजाच्या वतीने कासार जैन समाजाला भूषणावह असलेल्या कर्तृत्ववान महिला श्रीमती उषा रवींद्र कुत्ते यांना कासार भूषण महिला उद्योजकता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
समस्त सांगली जिल्हा कासार जैन समाजाला आनंदाची बातमी म्हणजे सांगलीतील नामांकित असलेल्या सांगली गॅस सर्विसेस व रवींद्र ट्रान्सपोर्ट च्या संचालिका श्रीमती उषा रविंद्र कुत्ते यांना त्यांच्या आजवरच्या व्यवसायातील वाटचालीसाठी श्री. पोपटलाल डोरले संस्थापक अध्यक्ष भारतीय जैन कासार संघटना व सांगली शाखेचे अध्यक्ष सागर घोंगडे, संन्मती महिला मंडळाच्या अध्यक्षा माधुरी गरगट्टे, यांच्या हस्ते "जैन कासार भूषण महिला उद्योजकता पुरस्कार" ही उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या पुण्यतिथी निमित्त श्री. ईश्वर रायणावर यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच महिलांसाठी हळदीकुंकू समारंभसुद्धा आयोजित करण्यात आला होता. यासमयी सन्मती महिला मंडळाच्या सर्व सदस्या व जैन कासार समाजातील सर्व पदाधिकारी बंधू-भगिनीसर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सांगली जिल्हा जैन कासार समाजाच्या वतीने यावर्षीपासून सांगली जिल्ह्यातील कर्तुत्वान महिलांसाठी कासार भूषण महिला उद्योजकता पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. सांगली जिल्हा जैन कासार समाजातर्फे वर्षभरात विविध कार्यक्रम राबवन्यात येत असतात
याप्रसंगी श्री सुहास काटकर, श्री किरण मांगले, श्री महावीर मांगले, श्री आनंद वणकुद्रे, श्री विजय कासार, तसेच सौ सुनीता मांगले, सौ शिल्पा गरगट्टे, सौ वैशाली केंबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.