| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ फेब्रुवारी २०२५
सांगली: महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची चळवळ ही राज्याच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणारी असल्याचे मत आमदार सुधीर (दादा) गाडगीळ यांनी व्यक्त केले. सांगली जिल्ह्याला सहकार क्षेत्राची उज्ज्वल परंपरा असून, येथील सहकारी संस्थांनी इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व सहकार परिषदेच्या निमित्ताने सहकारमहर्षी स्वर्गीय डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या स्मरणार्थ सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले. रविवारी सांगलीत या दिंडीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. "सहकाराची पंढरी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीत तुतारीच्या निनादात आणि ढोल-ताशांच्या गजरात फुलांचा वर्षाव करत दिंडीचे आगमन झाले.
सहकार दिंडीचे स्वागत व रॅलीचे आयोजन व्हिडिओ
सांगलीतील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्यालयापासून "जय सहकार"च्या घोषणांसह भव्य रॅली काढण्यात आली. आमदार सुधीर (दादा) गाडगीळ यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पृथ्वीराज (बाबा) पाटील, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी, महासचिव शशिकांत राजोबा, तसेच विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सहकाराच्या प्रचार आणि विस्तारासाठी राज्यभर सहकार दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पतसंस्थांच्या विश्वासार्हतेसाठी आणि सहकारी चळवळीची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशन पुढाकार घेत आहे. तसेच ८ व ९ फेब्रुवारी रोजी शिर्डीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत सहकार कायदे आणि पतसंस्था व्यवस्थापनासंबंधी विचारमंथन होणार आहे.
पतसंस्थांना भेडसावणाऱ्या समस्या आणि उपाययोजना
काकासाहेब कोयटे यांनी खाजगी वित्तीय कंपन्या जादा व्याजदराने कर्ज पुरवठा करत असल्याचे निदर्शनास आणले. या समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध "पी.एन. गाडगीळ ज्वेलर्स" आणि राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्यात भागीदारी