| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १ फेब्रुवारी २०२५
भारताच्या 2025 आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग आठव्यांदा हा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये विविध वस्तूंवरील करात बदल करण्यात आले असून, काही उत्पादने स्वस्त तर काही महागणार आहेत.
स्वस्त होणाऱ्या वस्तू आणि सेवा
इलेक्ट्रिक वाहने – कर कपातीमुळे ईव्ही गाड्यांचे दर कमी होणार
मोबाईल फोन – उत्पादन शुल्क कपातीमुळे स्मार्टफोन स्वस्त होतील
दागिने आणि चामडी वस्त्रे – आयात शुल्क सवलतीमुळे किमती घटतील
एलईडी आणि एलसीडी टीव्ही – स्थानिक उत्पादनास चालना देण्यासाठी कर सवलत
कॅन्सर उपचार आणि औषधे – कस्टम ड्युटी हटवल्याने खर्च कमी
वैद्यकीय उपकरणे – आरोग्य सेवा स्वस्त करण्यासाठी कर कपात
लहान मुलांची खेळणी – स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन दिल्याने किमती कमी
रेडीमेड कपडे – देशातच उत्पादन वाढवण्यासाठी कर सवलती
विमा पॉलिसी – बीमा प्रीमियमवर कर कपात
महाग होणाऱ्या वस्तू आणि सेवा
कपडे – उत्पादन खर्च वाढल्याने दरवाढ
गृहनिर्माण क्षेत्र – बांधकाम साहित्य महागल्याने घरे महागणार
अर्थसंकल्पातील इतर महत्त्वाच्या घोषणा
यंदाच्या अर्थसंकल्पात विज्ञान-तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि उद्योग क्षेत्रासाठी मोठ्या गुंतवणुकीच्या घोषणा करण्यात आल्या. कृषी क्षेत्राच्या विकासासाठीही विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीसाठी खास धोरणे आखण्यात आली आहेत.
हा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणारा ठरणार असून, विविध क्षेत्रांसाठी संधी निर्माण करण्याची अपेक्षा आहे.