| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ फेब्रुवारी २०२५
महाराष्ट्र सरकारने 13 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. मंत्रालयात हे दुसऱ्यांदा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा जोरदार फटका झाला आहे. यापूर्वी 2 जानेवारी 2025 रोजी 10 प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. राज्यातील राजकीय परिस्थिती आणि त्यासंबंधीच्या चर्चांमुळे राज्यातील प्रशासनात उलथापालथ दिसून येत आहे.
नवीन बदल्यांमध्ये काही प्रमुख अधिकारी खालीलप्रमाणे आहेत:
1. प्रवीण दराडे यांना प्रधान सचिव, सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
2. पंकज कुमार यांची सामान्य प्रशासन विभागात सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. नितीन पाटील यांना सचिव, राज्य मानवाधिकार आयोग, मुंबई पदावरून कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग, नवी मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
4. श्वेता सिंघल यांना राज्यपालांच्या सचिव पदावरून अमरावती विभागातील विभागीय आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
5. डॉ. प्रशांत नारनवरे यांना महाराष्ट्र राज्यपालांचे सचिव म्हणून मलबार हिल, मुंबई येथे नियुक्त करण्यात आले आहे.
मागील सरकारच्या काळातील अधिकाऱ्यांमध्ये एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाचे प्रमुख पदाधिकारी होते. यामुळे मुख्यमंत्र्यांना निर्णय प्रक्रियेत या अधिकाऱ्यांकडून अपेक्षित सहाय्य मिळत नव्हते. याच कारणामुळे या बदल्यांना महत्त्व दिले जात आहे.