सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ जानेवारी २०२५
मिरज शहरातील नागरी प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या मिरज सुधार समितीच्या नव्या कार्यकारी मंडळाची निवड वार्षिक सर्वसाधारण बैठकीत करण्यात आली. अध्यक्षपदी राकेश तामगावे तर, कार्यवाहपदी असिफ निपाणीकर यांची निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ऍड. सी. ए. पाटील तर, मिरज सुधार समितीचे संस्थापक ऍड. ए. ए. काझी उपस्थित होते.
अन्य निवड याप्रमाणे :
उपाध्यक्ष : संतोष जेडगे, राजेंद्र झेंडे, सहकार्यवाह : अभिजित दाणेकर,
खजिनदार : रामलिंग गुगरी,
संपर्क प्रमुख : श्रीकांत महाजन,
समन्वयक : शंकर परदेशी, कार्यकारी
सदस्य : शाहिद पीरजादे, नरेश सातपुते, सलीम खतीब, जहीर मुजावर, धीरज पोळ, वसीम सय्यद, झिशान मुश्रीफ, योगेश वडेरा, जावेद शरीकमसलत, तौफिक देवगिरी, अजीम बागवान, शमशोद्दीन देवगिरी, दिलीप नाईक, शब्बीर बेंगलोरे, इकबाल भालदार, सौ. सोनाली सिध्दार्थ पोळ यांची निवड करण्यात आली.
मिरज शहर सुधार समितीच्या माध्यमातून अनेक समस्यांना तोंड फोडल्या असून, शासकीय व नियम शासकीय अधिकाऱ्यांना या समस्या सोडवण्यासाठी धारेवर धरण्यात आले आहे. याची उत्तम उदाहरणे म्हणजे छत्रपती शिवाजी मार्गावरील डिव्हायडर आणि स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी, तसेच गणेश तलावातील स्वच्छता करण्यासाठी घेतलेला पुढाकार, त्याचप्रमाणे इतरही अनेक समस्या सोडवण्यासाठी मिरज शहर सुधार समितीने उत्तम कामगिरी केलेली आहे. यामुळे मिरज शहर व ग्रामीण भागातील ही नागरिकांनी या समितीचे वारंवार कौतुक केले आहे.