| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ जानेवारी २०२५
राजगुरुनगर येथील कार्तिकी व दुर्वा यांच्या निर्घृण हत्येनंतर गोसावी समाज आक्रमक झाला असून, विविध ठिकाणी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर गोसावी समाजाचे नेते आकाश गोसावी यांनी आ. सुधीर दादा गाडगीळ, आ. सुरेश भाऊ खाडे, आ. जय गोरे, आ. राहुल आवाडे, आ. सत्यजित देशमुख यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हत्येतील आरोपीवर फास्ट कोर्टात खटला चालवण्यात यावा, यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी, या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीआयडीमार्फत व्हावा अशी मागणी केली आहे.
दरम्यान आकाश गोसावी यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, सर्व परिस्थिती कथन केली व मकवाने कुटुंब यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दहा लाख रुपये देण्याचे आदेश काढले. या संपूर्ण प्रकरणात सुरुवातीपासून आकाश गोसावी यांनी कार्तिकी व दुर्वा या अभागी चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण राज्यातील गोसावी समाजाला एकत्र करून जन आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून रान पेटवले आहे. या दोघी आभागे भगिनींना न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञाच आकाश गोसावी यांनी केली आहे. दरम्यान मकवाने कुटुंबियांना शासकीय मदत मिळाल्याने, समाजातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.