yuva MAharashtra शासकीय नेत्रचिकित्सा अधिकारी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी गणेश आनंदे यांची निवड !

शासकीय नेत्रचिकित्सा अधिकारी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी गणेश आनंदे यांची निवड !


सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ जानेवारी २०२५

गणेश आनंदे यांनी आयुष हेल्पलाइन टीम मध्ये आयुष ब्लड टिमची धुरा सांभाळ सांभाळत असताना अनेक गरजू रुग्णांना त्यांनी ब्लड उपलब्ध करून दिले. अनेक सामाजिक संघटनांना ब्लड कॅम्प घेण्यासाठी प्रोत्साहित केले.  हे काम करीत असतानाच शासकीय नोकरीमध्ये नेत्रचिकित्सा अधिकारी म्हणून सिंधुदुर्ग शिरोडा येथे नोकरी सुरू झाली. तिथे चार वर्षे नोकरी करत आहेत. परंतु ही नोकरी केवळ नोकरी म्हणून नव्हे तर कर्तव्य भावनेच्या जबाबदारीतून ते कार्य करीत आहेत.


या दोन्हीचा अनुभवावर त्यांना शासकीय नेत्रचिकित्सा संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आयुष सेवाभावी संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

बातमी सौजन्य - अभिजीत शिंदे, सांगली.