yuva MAharashtra सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर संपन्न !

सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर संपन्न !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ जानेवारी २०२५
सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अल्पसंख्याक विभागाचे सांगली शहर जिल्हाध्य्क्ष अल्ताफ पेंढारी मित्र परिवाराच्या वतीने काल नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १३०गरजू रुग्णांना मोफत चष्मे देखील वाटप करण्यात आले त्याचबरोबर १३० वृद्ध लोकांच्या करिता आधारकाठी वाटप देखील करण्यात आले. गुलाबराव पाटील फिजिओथेरपी हॉस्पिटलच्या वतीने या ठिकाणी आर्थोपेडिक पेशंट करता शिबिराचे आयोजन करण्यात आले . ८० लोकानी याचा लाभ घेतला. 

पृथ्वीराज पाटील यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, 'अल्ताफ पेंढारी हे कायम असे चांगले उपक्रम घेतात. या भागातील नागरिकांना मदत करताना कायम ते अडीअडचणीत धावून येतात. जेष्ठ नागरिकांचा आदर ही आपली संस्कृती आहे. उतारवयात त्यांना आधार व सेवा देणारी व्यवस्था घराघरात निर्माण झाली पाहिजे.'


यावेळी संजयनगर, यशवंतनगर, अभयनगर, हडको काॅलनी या भागातील नागरिकांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला. 
शिबीर यशस्वी करण्यासाठी कासा तिआरा अपार्टमेंट मधील फोंडे व कुराडे आणि तेथील रहिवाशांची मोलाची मदत झाली आहे. 
जेष्ठांबद्दलचा आदर व्यक्त करणारा मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मा व काठी वाटप उपक्रमांबद्दल विविध स्तरातून नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 

यावेळी पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम, माजी नगरसेवक इलाही बारूदवाले, नंदकुमार साळुंखे, राजू कलाल,रणजीत कलाल श्रीकांत साठे, पैगंबर शेख, मौला वटमुरे, सुनील भिसे साहेब तसेच प्रभागांतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.