| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ जानेवारी २०२५
भाजपाचे युवा नेतृत्व पै. पृथ्वीराज पवार यांनी सांगली महापालिकेच्या भंगार साहित्य विक्री प्रकरणात हस्तक्षेप केला असून, त्यांनी काल वैभव साबळे यांची भेट घेऊन याबाबत तक्रार नोंदवली आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा हा विषय असून यात निकोपस पडता झाली पाहिजे, ज्याला निविदा भरायची असेल त्यांची अडवणूक करू नका महापालिकेच्या बाहेर खुर्च्या टाकून कारभार करायला हे शहर कोणी विकत घेतलेले नाही अशा कडक शब्दात त्याने साबळे यांना सुनावले.
पै. पृथ्वीराज पवार यांच्या हस्तक्षेपानंतर महापालिका प्रशासनाने पंधराशे टन भंगार साहित्य विक्री प्रकरणी ऑनलाइन प्रक्रिया का राबविले नाही ? ज्या कंपनीकडून निविदा काढण्यात आली, त्यांच्याकडून कोंडी करणारी भूमिका काय घेतली जात आहे ? अर्ज करण्यास महापालिकेत येण्याची गरज काय ? असे अनेक प्रश्न या प्रकरणी उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे याप्रकरणी प्रशासनाने स्थळ पाहणे आणि निविदा भरण्यात मुदतवाढ देण्याचा विचार सुरू केला आहे.
''भंगार साहित्य निविदा प्रक्रियेबाबत तक्रारी येत आहेत. या निविदा काही ठराविक लोकांसाठी काढल्या आहेत, असे चित्र समोर येत आहेत. त्यातून मनपाचे नुकसान होईलच, शिवाय काळ सोकावेल. ज्या कुणाला निविदा भरायची आहे, त्यांना मोकळीक हवी. सुरक्षित वातावरण हवे. तांत्रिक अडचणी निर्माण करून काही लोकांचा फायदा करून देण्याचा प्रयत्न होत असेल तर मी खपवून घेणार नाही. निविदा भरण्यास आणि त्याआधी स्थळ पाहणीस मुदतवाढ द्या. त्यासाठी नेमलेले अधिकारी जागेवर असू द्यात. त्यांचे फोन बंद असतील तर त्यांना आम्ही शोधून काढू. हा प्रकार थांबला पाहिजे.''
- पै. पृथ्वीराज पवार
भाजप किसान मोर्चा.