yuva MAharashtra सिव्हिल हॉस्पिटलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह ? चोरीचा छडा लावा, अन्यथा आरोग्यमंत्र्याकडे करणार तक्रार - संतोष पाटील

सिव्हिल हॉस्पिटलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह ? चोरीचा छडा लावा, अन्यथा आरोग्यमंत्र्याकडे करणार तक्रार - संतोष पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ जानेवारी २०२५
हत्यार बंद महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या एक वेळ २० जणांची टीम, आवारातच पोलीस चौकी, शेकडो सी सी टीव्ही कॅमेरे, शेकडो कर्मचारी यांच्या डोळ्या देखत, नाकावर टिचून चाणक्य चोरट्याने कॉपर पाईपची चोरी केली. परंतु हे कोणाला न पटण्यासारखं आहे.

गेल्या दोन महिन्यामागे सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालया मधील एसी व आयसीयूला ऑक्सिजन सप्लाय करणाऱ्या कॉपर पाईपंची चोरी झाली आहे. जवळजवळ बाजार भावाप्रमाणे आठ ते दहा लाख रुपये किमतीची कॉपर पाईप आहे. सिव्हिल हॉस्पिटल मधील माहिती असणाऱ्या चाणाक्ष चोरट्याने हॉस्पिटलच्या प्रशासनाला व काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून चोरी केली आहे. अशी कुजबूज सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात चालू आहे.

दोन महिन्यापासून याचा छडा लागला नाही म्हणून संतोष पाटील व त्यांचे सहकारी पद्मभूषण वसंतदादा शासकीय रुग्णालय सांगली हॉस्पिटल येथील अधिष्ठाता यांना भेटण्यासाठी गेले होते, परंतु अधिष्ठाता हजर नसल्यामुळे त्यांचे सहाय्यक उपअधिष्ठाता डॉ. श्रीकांत अहंकारी यांच्याशी भेटून चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.


या निवेदनात म्हटले आहे की, ज्या वेळेला महाराष्ट्रातील सरकार स्थापन नव्हते अशा काळात संधी साधून काही चाणाक्ष चोरट्यानी अत्यंत महागडी असणारी कॉपरची पाईप चोरून नेऊन त्याची विल्हेवाट लावली आहे, या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कंपाऊंड असताना हॉस्पिटलच्या आतमध्ये पोलीस चौकी असताना, कॉपर पाईप चोरीला जाते हे आश्चर्यकारक आहे. 

सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे भिंतीला काही भगदाडे आहेत त्या भगदाडातून पूर्ण माहिती असणाऱ्या चोरट्यानेच त्याची चोरी केली असावी अशी माहिती संतोष पाटील यांनी उपअधिष्ठांना दिली. या वेळेला संतोष पाटील म्हणाले की, येत्या महिन्याभरात याचा छडा नाही लागला, तर राज्याचे आरोग्य मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री यांना निवेदन दिले जाईल व याची सर्व जबाबदारी ज्या वेळेला चोरी झाली त्या वेळेचे पोलीस, एमएसएफचे कर्मचारी व त्या ठिकाणी असणारे प्रशासन याला जबाबदार धरले जावे, अशी माहिती निवेदनात दिली आहे.

या वेळेला प्रा.नंदकुमार सुर्वे, मनोज कांबळे, एम के कोळेकर, खुदबुद्दीन मुजावर, प्रथमेश शेटे, सुलेमान पटेल, अनुराधा शेटे, प्रताप पाटील व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी सर्वांनी सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.