| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ जानेवारी २०२५
सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात मालमत्ता करामध्ये नव्याने कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मात्र आतापर्यंत जलनि:सारण आणि पाणीपट्टी करामध्ये न झालेली कर आकारणीमुळे मालमत्ता आकार नाही करत वाढ झाल्याचे दिसत आहे. मात्र कोणत्याही मालमत्ता धारकावर अन्याय न होता त्यांचे संपूर्ण समाधान करून न्यायिक पद्धतीने कर आकारणी करण्यात येईल असे प्रतिपादन मिरज व कुपवाड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख याने पत्रकार परिषदेत केले.
सध्या कुपवाड मधील मालमत्ता धारकांना नोटीसा बजावण्यात आल्या असून, लवकरच सांगली व मिरजेतील मालमत्ता धारकांना नोटीसा बजावण्यात येतील. त्यावर हरकत घेण्याचे 21 दिवसांची मदत असून, ही मुदत मालमत्ताधारकांना मिळाल्यानंतर गृहीत धरण्यात येईल. असे सांगून निलेश देशमुख म्हणाले की सध्या नागरिकांमध्ये मालमत्ता कर आकारणी बाबत संभ्रमावस्था आहे. परंतु कर निर्धारण महाराष्ट्र महापालिका अधिनियम प्रमाणेच लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये 2002-03 मधील कोष्टकाप्रमाणे कर आकारणी करण्यात आली आहे.
महापालिकेतर्फे आतापर्यंत जलनिस्सारण व पाणीपुरवठा कर आकारण्यात आलेला नव्हता नव्हता. यावेळी त्याची आकारणी करण्यात आली आहे. एखाद्या भागात ड्रेनेज व्यवस्था केव्हा पाणीपुरवठा व्यवस्था नसली तरी, कायद्यानुसारच सर्व मालमत्ताधारकांना समान न्याय हक्काने कर आकारणी करण्यात आली आहे. भाडे करारा बाबत कर आकारणी किंवा चुकीच्या पद्धतीने मोजणी झाली असल्यास त्याचे योग्य ते निराकरण करण्यात येईल अशा आश्वासन निलेश देशमुख यांनी यावेळी दिले.