| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ जानेवारी २०२५
दोन महिन्यापूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला अनपेक्षितपणे प्रचंड मोठे यश मिळाले तर महाआघाडीचा सुपडासाफ झाला. त्यामुळे विरोधकांनी थयथयाट सुरू केला. अपयशाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले. त्याचवेळी महायुतीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी, लोकसभा निवडणुकीत महायुतीची पीछेहाट झाली तेव्हा महाआघाडीतील नेते व कार्यकर्त्यांनी या ईव्हीएम मशीनवर का आक्षेप घेतला नाही ? असे सडेतोड उत्तर दिले.
या दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित आमदार उत्तमराव जानकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केल्याने सोलापूर जिल्ह्यात व माळशिरस तालुक्यात राजकीय हलकल्लोळ माजला. यावेळी मरकरवाडी गावातील नागरिकांनीही बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी सुरू केली. मात्र पोलिसांच्या कडक कारवाईच्या इशाऱ्यानंतर ही प्रक्रिया थांबली.
मात्र आता माळशिरस तालुक्यातीलच धानोरे गावातून हात उंचावून नावाचे मतदान पार पडले. यावेळी विधानसभा निवडणुकीत जानकर यांना ईव्हीएम मध्ये 963 मतांची नोंद झाली होती. मात्र नुकत्याच झालेल्या या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत बाराशे सहा मते पडल्याचे समोर आले आहे. यानुसार एकाच गावात 243 मतांचा फरक पडला असेल तर संघात किती मोठा फरक पडू शकतो सवाल आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून केला जात आहे.
आता धानोरे आणि मरकडवाडी गावासह अनेक गावातील हजारो नागरिकांनी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे असे निवडणूक आयोगाच्या नावाने प्रतिज्ञापत्रे तयार केले आहे. आता बच्चू कडू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माळशिरस चे आमदार उत्तमराव जानकर हे निवडणूक आयोगाला प्रत्यक्ष नेऊन देणार आहेत.
जर ईव्हीएम मशीनला ट्रॅप लावला नसता तर अजित पवार वीस हजार मतांच्या फरकाने पराजित झाले असते अजित पवार विजय झाल्याचा आरोप उत्तमराव जानकर यांनी केला आहे. आपण या विषयाचा तळ गाठणार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.
आगामी महिन्यात दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यावेळी ईव्हीएमला ट्रॅप लावला तर नक्कीच पकडले जाल, नाही लावला तर भाजप हद्दपार होईल. असा आरोप उत्तमराव जानकर यांनी केला आहे ज्यावेळी उत्तम जानकर राजीनामा देईल त्यावेळी अजित दादा तुम्ही सत्तेतून बाहेर असाल एवढेच मी खात्रीने सांगतो असे जानकर यांनी यावेळी म्हटले आहे.
त्यामुळे आता महायुती आ. उत्तमराव जानकर आणि बच्चू कडू यांच्या ईव्हीएम हटाव अभियानास काय आणि कसे तोंड देते हे लवकरच दिसून येईल.