yuva MAharashtra स्वच्छ शहर, सुंदर शहरासाठी महापालिकेचा पुढाकार !

स्वच्छ शहर, सुंदर शहरासाठी महापालिकेचा पुढाकार !

फोटो सौजन्य  - Flickr. Com

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ जानेवारी २०२५
आता वरिष्ठ अधिकारी सुद्धा रस्त्यावर उतरून स्वच्छता नियोजनात भाग घेऊन सकाळपासून स्वच्छता करण्यासाठी लक्ष केंद्रीत करत आहेत. उपायुक्त श्रीमती विजया यादव यांनी सकाळी अचानकपणे परिसर पाहणी करून स्वच्छता मोहीम तीव्र केली आहे.

सादिक पठाण शिवसेना उप शहर प्रमुख शिंदे गट मिरज शहर यांनी खुल्या दिलाने पालिकेच्या कामाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. समस्या होती मैशाळ रोड वांढरे ट्रेडर्स समोरील परिसर कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधी. त्याचा नागरिकांना त्रास होत होता. नागरिकांनी तक्रार केली आणि सत्वर दखल स्वच्छता निरीक्षक सचिन वाघमोडे यांनी घेऊन सह आयुक्त अनिस मुल्ला यांच्या टीम यांनी अनोखे नियोजन केले. नागरिकांनी कचरा टाकू नये या साठी

परिसराची स्वच्छता केलीच पण त्या ठिकाणी सुशोभिकरण करून परिसराचे रुपडेच बदलले, बदलेल्या परिसराचे रूप पाहून लोकांनी देखील दखल घेतली आहे. आपली प्रतिक्रिया नोंद करून धन्यवाद देत आहेत.

कुठेतरी काही लोकांच्या चुकीच्या वागण्याने कचऱ्याचे शहर म्हणून नाव पडत होते. पण काल तीन जानेवारीला एक चांगला अनुभव मिळाला!

कचऱ्याच्या ठिकाणी सुशोभिकरण करून कचरा गायब तर केलाच पण इथल्या जनमनाला एक सुखद धक्का मिळाला. ज्यावेळी सर्व मिरजकर गुलाबी थंडीमुळे झोपेत होते. त्यावेळी मनपा

आरोग्य विभागाच्या टीमने एक कचऱ्याचा पॉईंट गायब केला आणि त्या जागी सुशोभिकरण करून वार्ड क्रमांक पाचचे स्वछता निरीक्षक सचिन वाघमोडे ह्यांनी केला. कचरा दिसल्यास मनपा आरोग्य विभागाला नावे ठेवण्यात सर्व जण अग्रभागी असतात, पण चांगल्या कामाला दाद देणारे अपवाद असतात. पण आम्ही सतत काम करण्याऱ्याच्या मागे ठामपणे ढाल म्हणून उभे राहू. आपली साथ पण हवी आहे.

यावेळी सेवाभावी, संस्था, सामाजिक कार्यकर्ते संस्था यांनी परिसर सुशोभीकरण मोहीम मध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन आयुक्त यांनी केले आहे.