| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १२ जानेवारी २०२५
गेल्या काही दिवसात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, सरकार व ऑनलाईन व्यवहार करणारे बँक ग्राहक यांनी सतर्कता बाळगूनही, नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. सामान्य नागरिकांना लुटण्यासाठी सायबर गुन्हेगार दररोज एका नव्या मार्गाचा अवलंब करीत असल्याने पोलीसही हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. 'जंप्ड डिपॉझिट स्कॅम' नावाचा आता एक नवा स्कॅम आला असून, ज्यामुळे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) वापर करताना सायबर गुन्हेगार टार्गेट करीत आहेत. त्यामुळे नागरिकातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कसा होतो फसवणुकीचा प्रकार ?
या घोटाळ्यात सायबर गुन्हेगार यूपीआयच्या माध्यमातून बँक ग्राहकांच्या खात्यात प्रथम अल्पशी रक्कम जमा करतात. त्यानंतर बँक ग्राहकांना त्यांच्या खात्यात चुकीने रक्कम जमा झाल्याची सांगून ही रक्कम परत करण्याची विनंती करतात. खात्यात पैसे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते अनेकदा यूपीआय ॲपवरून बॅलन्स तपासतात. आणि पिन टाकतात, यावेळी या माध्यमातून बनावत ट्रांजेक्शन ची रिक्वेस्ट पाठवलेली असते. आपला पिन नंबर टाकतात ही रिक्वेस्ट मान्य केली जाते आणि संबंधितांच्या खात्यातून पैसे काढून घेतले जातात.
त्यामुळे आपल्या खात्यावर अनोळखी तिकडून पैसे मिळाल्यानंतर सावध राहण्याचा इशारा पोलीस खात्याकडून देण्यात आला आहे. जर असा प्रकार कोणाबाबत घडल्यास तात्काळ स्थानिक पोलिसांची किंवा सायबर विभागाशी संपर्क साधण्यात यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
कशी घेता येईल काळजी ?
एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून आपल्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्यास तात्काळ बॅलन्स तपासून नका. त्यामुळे रिक्वेस्ट ची मुदत संपेल आणि स्कॅमर्सना तुमचा पिन वापरण्याची संधी मिळणार नाही. जर बँक बॅलन्स तपासावयाचा असेलच तर चुकीचा पिन नंबर टाकून बॅलन्स तपासा. त्यामुळे कोणतीही रिक्वेस्ट स्वीकारली जाणार नाही आणि तुमचे पैसे सुरक्षित राहतील. असे पोलीस सायबर विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.