| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० जानेवारी २०२५
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवार दि.23/01/2025 रोजी सकाळी 11:00 वाजता हिंदू एकता आंदोलन व विशाळगड मुक्ती आंदोलन यांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत विशाळगड इस्लामिक अतिक्रमणमुक्त होत नाही तोपर्यंत पर्यटनासाठी खुला करू नये. विशाळगडावर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पावसाळा संपल्यानंतर अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करायची होती, हिवाळा संपल्यानंतर ही अतिक्रमण हटाव मोहीम चालू झाली नाही. तरी सदरचे अतिक्रमण लवकरात लवकर काढण्यात यावे.
विशालगडावर मुस्लिम सरदार मल्लिकेरहांनच्या नावाने बेकायदेशीर बांधलेल्या दर्ग्याचे बांधकाम जमीनदोस्त करा. आणि त्यात दर्ग्यात भरणारा ऊरसावर कायमस्वरूपी बंदी घाला. नरवीर बाजीप्रभू देशपांडे व नरवीर फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीस्थळी शासनाच्या वतीने उचित स्मारक उभे करावे. या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष विशालगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रण मा. नितीन शिंदे करणार आहेत.
या आंदोलनाला सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन हिंदू एकता आंदोलन सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा. संजय जाधव, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मा. दीपक देसाई, जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बराले, शहराध्यक्ष गजानन तोडकर, प्रकाश चव्हाण, दत्तात्रय भोकरे, मनोज साळुंखे, अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, अरुण वाघमोडे, प्रतीक दिसले, गणेश नारायणकर यांनी केले आहे.