yuva MAharashtra सांगली महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळेची इमारत धोकादायक, विद्यार्थ्यांच्या जीवनात अपाय होण्याची शक्यता !

सांगली महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळेची इमारत धोकादायक, विद्यार्थ्यांच्या जीवनात अपाय होण्याची शक्यता !

फोटो सौजन्य  - दै. ललकार 

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ जानेवारी २०२५

सांगली वार्ड क्रं.१० मधील राजर्षी शाहू कॉलनी (नवीन वसाहत) मधील सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्राथमिक शाळा नंबर. ३८ च्या इमारतीची अवस्था बिकट झाली असून, इमारत धोकादायक स्थितीत असून देखील याच इमारतीमध्ये विद्यार्थी ज्ञानार्जन घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला अपाय होण्याची शक्यता पालकांकडून व्यक्त होत आहे.


एके काळी प्रचंड विद्यार्थी संख्या असणाऱ्या या शाळेची अवस्था दयनीय झाली असून, दिवसेंदिवस पटसंख्या कमी होत आहे. इमारतीच्या छताला तडे गेले असून, अनेक ठिकाणी छताचा गिलावा पडलेला आहे. लाईट फिटींग निखळलेले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असुन स्वच्छता गृह मोडकळीस आलेली आहेत. वर्गामध्ये दगडी परश्या तसेच छत्ररंजी नसलेने विद्यार्थ्यांना सिमेंट कोब्यावर बसावे लागत आहे. अशा या विद्यार्थ्यांच्या जीवित अशी आणि पोचवण्याची शक्यता असलेल्या शाळेची इमारत तात्काळ दुरुस्त करावी अशी मागणी पालकातून करण्यात येत आहे.