| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २१ जानेवारी २०२५
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व गड किल्ल्यावरील अतिक्रमणे 31 मे पर्यंत हटवण्याबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून, याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण करण्यात आली आहे.
31 जानेवारीपर्यंत सरकारने जिल्हाधिकाऱ्यांकडून अतिक्रमणांची यादी मागवली असून एक 30 मे पर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व अतिक्रमणे हटवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अतिक्रमण हटवल्यानंतर ते पुन्हा होऊ नयेत, म्हणून दक्षता समितीची नेमणूक ही करण्यात आली आहे. राज्यात केंद्र संरक्षित 47 किल्ले आणि राज्यसंरक्षित 62 किल्ले आहेत. किल्ल्यांच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्य समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
राज्यातील गणित संदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला असून, त्यामुळे आता अतिक्रमणामुळे गुदमरणारे किल्ले मोकळा श्वास घेऊ शकणार आहेत.. राज्य सरकार गडकिल्ल्यांचे सौंदर्य जतन करण्यासाठी दीर्घकालीन योजना हाती घेणार आहे. यासाठी सर्वप्रथम किल्ल्यावरील सर्वच अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. तसेच भविष्यात पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाबाबत, छत्रपती संभाजीराजे आणि हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार आंदोलन उभे केले आहे. त्यानंतर हा प्रश्न अहिराणी वर आला. विशाळगडाप्रमाणेच राज्यातील अनेक गड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचे बाब सरकारच्या निदर्शनास आली. याबाबत हिंदुत्ववादी संघटनांनी सरकारला ही अतिक्रमणे हटवून गड किल्ल्याचे पावित्र्य राखण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान माजी आमदार, हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे आज हे आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत.