| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ जानेवारी २०२५
ज्याला अभिजात सद्गुरू परंपरेची मान्यता आहे. प. पू. गुरूदेव तात्यासाहेब कोटणीसांना बहाल झालेली चिमड संप्रदायाची गुरूपरंपरा आज तागायत प. पू. गुरूनाथ महाराजांनी संवर्धित केली आहे. बौद्धिक सिद्धतेला प्रमाणपत्राची जोड हवी असे म्हणतात, त्यानुसार श्री. रामचंद्र तथा संजयराव कोटणीस यांना साहित्य सृजन, आध्यात्म आणि सामाजिक सेवा या कार्यासाठी विद्यावाचस्पति अर्थात डॉक्टरेट प्रमाणपत्र मिळाले आहे.
ह.भ.प. हो संजय कोटणीस हे उच्च शिक्षित असून कीर्तन सेवेची परंपरा त्यांनी तिसऱ्या पिढीतही सुरू ठेवली आहे. अत्यंत ओघवती व रसाळ भाषा, मृदू स्वभाव, सोदाहरण मार्मिक किर्तन या त्यांच्या वैशिष्ट्यामुळे, त्यांना मोठी समाज मान्यता मिळालेली आहे.
ह.भ.प. संजयराव कोटणीस यांना मिळालेल्या डॉक्टरेट पदवी बद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.