yuva MAharashtra सांगली येथे ध्वज पूजनाने 'श्री राम कथा, नामसंकीर्तन' सोहळ्यास सुरवात, टाळ मृदंग, मंत्रोपचाराने दुमदुमली अवघी अयोध्यानगरी !

सांगली येथे ध्वज पूजनाने 'श्री राम कथा, नामसंकीर्तन' सोहळ्यास सुरवात, टाळ मृदंग, मंत्रोपचाराने दुमदुमली अवघी अयोध्यानगरी !

फोटो सौजन्य - दै. सत्यदूत

सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १९ जानेवारी २०२५

जय श्री राम असा जयघोष, टाळ मृदुंगगाचा गजर, मंत्रोपचार, हजारो भाविकांची उपस्थिती अशा भक्तिमय वातावरणामध्ये ध्वज पूजन करत येथील आयोध्यानगरी मध्ये श्री राम कथा व नामसंकीर्तन सोहळ्याचे जल्लोषात सुरवात झाली. श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्याहस्ते ध्वजाचे पूजन करण्यात आले.

श्री राम मंदिराच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आजपासून २७ जानेवारीपर्यंत 'श्री राम कथा व नामसंकीर्तन सोहळा' आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात केज (बीड) चे समाधान महाराज शर्मा हे रामकथा मराठीतून सांगणार आहेत. यानिमित्त ध्वजारोहण, नामसंकिर्तन सोहळा, शोभायात्रा, श्रीराम विवाह, श्री राम राज्याभिषेक श्रीराम जन्मोत्सव अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यादरम्यान १८ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान समाधान महाराज शर्मा हे दररोज दुपारी २.३० ते संध्याकाळी ६ यावेळेत मराठीतून रामकथा सांगणार आहेत. तर २२ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.


दरम्यान आज ध्वजपूजन करत या सोहळ्यास भक्तिमय वातावरणात सुरवात करण्यात आली. यावेळी शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे (गुरुजी), मनोहर (काकाजी) सारडा, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, आमदार सत्याजित देशमुख, जनसुराज्याचे समितदादा कदम, माजी आमदार नितीन शिंदे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, रावसाहेब पाटील, हार्दिक सारडा, सिद्धार्थ गाडगीळ, माजी नागरसेवक लक्ष्मण नवलाई यांच्यासह सोहळा समितीचे सदस्य व श्रीराम प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते विजयदादा कडणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.