yuva MAharashtra माजी आमदार धुळाप्पाण्णा नवले यांना सांगलीत काँग्रेस पक्षातर्फे विनम्र अभिवादन !

माजी आमदार धुळाप्पाण्णा नवले यांना सांगलीत काँग्रेस पक्षातर्फे विनम्र अभिवादन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली  - दि. १६ जानेवारी २०२५

सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष सातारा सांगली लोकल बोर्ड चे अध्यक्ष स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकारी मुंबई समिती सदस्य सचिव माजी आमदार धुळाप्पाण्णा नवले यांच्या जयंतीनिमित्त सांगली काँग्रेस भवन सांगली येथे अभिवादन करण्यात आले.

प्रारंभी धुळाप्पांण्णा नवले यांच्या प्रतिमेस विक्रमसिंह पाटील व बाबगोंडा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले व उपस्थितांनी फुले वाहून आदरांजली वाहिली.

यावेळी बोलताना प्रदेश संघटक पैगंबर शेख यांनी, धुळाप्पाण्णा नवले यांच्यासारख्या अनुशासित व शिस्तबद्ध अध्यक्षांनी या काँग्रेस पक्षाचे धुरा सांभाळत असताना, काँग्रेस पक्ष वाढीसाठी त्यांनी दिलेले योगदान फार महत्त्वाचे आहे असल्याचे सांगून, आज त्यांच्या मार्गाने आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष बळकट करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केले.


यावेळी स्वागत व प्रास्ताविक अजित ढोले यांनी केले त्यावेळी त्यांनी बोलताना धुळाप्पांण्णा नवले यांच्याबाबतच्या आठवणी जागृत केल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले की, धुळाप्पाण्णा वयाच्या विसाव्या वर्षी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला होता. 1937 साली ते सातारा सांगली लोकल बोर्ड चे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. 1963 ते 1972 या कालावधीमध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संघाचे आमदार म्हणून काम केले आहे. 

त्यांच्या कारकिर्दीमध्ये 1955 ते 1959 सांगली येथे काँग्रेस भवन उभारणी झाली. 1960 साली ते जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंत दादा पाटील यांना त्यांच्यातील मतभेद दूर करून त्यांना एकत्र आणण्याचे त्यांनी काम केले होते. अशी आठवणही ढोले यांनी सांगितली. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. अशा या थोर विभूतीला सांगली जिल्हा काँग्रेस व काँग्रेस सेवा दलाच्या वतीने विनम्र अभिवादन केले.

यावेळी सेवा दलाचे कार्याध्यक्ष अनिल मोहिते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. विठ्ठलराव काळे, शमशाद नायकवडी, मीना शिंदे, विश्वास यादव, इंटकचे डी.पी. बनसोडे, अपंग सेलचे सुरेश गायकवाड, भीमराव चौगुले, नामदेव पठाडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.