| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ जानेवारी २०२५
सांगली महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या फिश मार्केट वास्तूचे काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावे, ही फिश मार्केट सर्व सोयी सुविधायुक्त असावे याकडे प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी भर देण्याचे अपेक्षा मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे यांनी येथे व्यक्त केली.
येथील खणभागामधील महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत फिश ममार्केच्या भूमिपूजनानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार. विशाल पाटील, महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, पुणे विभाग मत्स्य व्यवसाय प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे, महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, महापालिका शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार नितीन शिंदे, भाजप नेत्या नीता केळकर, सम्राट महाडिक, स्वाती शिंदे, सुनंदा राऊत यांच्यासह आणि माजी पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. नितेश राणे पुढे म्हणाले की, हा अतिशय चांगला प्रकल्प आहे. विकासाची प्रक्रिया यापुढेही अशीच चालू ठेवावी. आधीच्या चांगल्या सोयीसाठी या वस्तूमध्ये आणखी एक मजला वाढवण्यासाठी व कोल्ड स्टोरेज बाबत मागणी करण्यात आली आहे त्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा लवकरात लवकर तो आपण मंजूर करू. शासन म्हणून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत. येथे फिश मार्केट तयार झाल्यानंतर मत्स्य व्यावसायिकांनी रस्त्यावर फिश मार्केट मधूनच नागरिकांना चांगल्या प्रतीचे मासे उपलब्ध करून द्यावेत.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना खा. विशाल पाटील म्हणाले की, सांगली शहरात एक चांगली वस्तू उभारत आहे. यासाठी आवश्यकता भासल्यास खासदार फंडातूनही मदत करू.
यावेळी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता म्हणाली की फिश मार्केट पूर्ण होईपर्यंत येथील व्यवसायिकांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे ही वास्तू लवकरात लवकर उभी करण्यासाठी आपण प्रयत्न कर. या वास्तूमध्ये आणखी एक मजला व कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी आवश्यक तो प्रस्ताव लवकरात लवकर सादर करू. या माध्यमातून मत्स्यव्यवसायिकांना व्यवसाय करण्याची चांगली संधी उपलब्ध होईल असे ते म्हणाले.
माजी नगरसेविका स्वाती शिंदे यांनी यावेळी ही वास्तू उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर सांगली शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम अत्याधुनिक करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले.
प्रास्ताविक भाषणात बोलताना अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या फिश मार्केटच्या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम 8 कोटी 7 लाख 53 हजार सांगून, कामाचे क्षेत्रफळ 1520 चौरस मीटर असल्याचे ते म्हणाले. यामध्ये तीन बाय तीन मीटरचे 81 दुकान गाळे, मासळी बाजारमध्ये वेस्ट डिस्पोजल युनिट, 14.73 मीटर बाय तीन मीटरची स्टोअर रूम, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, ग्रॅनाईट फ्लोरिंग, प्रत्येक दुकानासाठी मासे स्वच्छते करिता स्वतंत्र नळ कनेक्शन व प्लॅटफॉर्म, ड्रेनेज व्यवस्था, तीन मीटर रुंदीचे अंतर्गत पॅसेज,, 100 दुचाकी व तीस चार चाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था अशा सोयी सुविधा असल्याचे अडसूळ यांनी सांगितले.