yuva MAharashtra ज्येष्ठ पत्रकार अण्णा कोरे यांचे निधन !

ज्येष्ठ पत्रकार अण्णा कोरे यांचे निधन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ जानेवारी २०२५
सांगली येथील जेष्ठ पत्रकार अण्णासाहेब दुंडाप्पा कोरे (वय ७४) यांचे अल्पशा आजारामुळे सोमवारी रात्री निधन झाले. एक अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ख्याती होती. सांगलीतील दैनिक राष्ट्र शक्ती, लोकमत, पुढारी आणि तरुण भारत येथे विविध पदावर त्यांनी काम केले. तरुण भारत मधून मुख्य उपसंपादक पदावर ते निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे, कनिष्ठ बंधू, पुतण्या असा परिवार आहे. 

सकाळी अमरधाम स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन बुधवार दिनांक 8 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता अमरधाम स्मशानभूमी येथे होणार आहे. अण्णा कोरे हे पत्रकार गृहनिर्माण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष होते. त्यांच्या निधनामुळे शहरातील अनेक संस्थांनी पत्रकार दिनाचे कार्यक्रम स्थगित ठेवून त्यांना आदरांजली वाहिली.