yuva MAharashtra "तिळगुळ घ्या विकासासाठी गोड भूमिका घ्या" म्हणत, खा. विशाल पाटील यांनी घातली साद !

"तिळगुळ घ्या विकासासाठी गोड भूमिका घ्या" म्हणत, खा. विशाल पाटील यांनी घातली साद !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई  - दि. १५ जानेवारी २०२५

मकर संक्रातीचा मुहूर्त साधत मंगळवारी खासदार विशाल पाटील यांनी मुंबईत मंत्रालयात महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. "तिळगुळ घ्या गोड बोला !" असे म्हणत विकासासाठी पक्षभेद बाजारात ठेवून सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी त्यांनी भेट घेतलेल्या सर्वच मंत्री महोदयांनी विकास कार्याल मदतीबाबत आश्वस्त केले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पर्यटन व खणीकर्म मंत्री शंभूराजे देसाई, ओबीसी व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश अबिटकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांचा खासदार विशाल दादांनी भेट घेतलेल्या मंत्र्यांमध्ये समावेश होता.

वास्तविक मंत्रिमंडळ स्थापनेनंतर लगेचच या मंत्र्यांची भेट घेण्याचे खा. विशाल दादा पाटील यांनी ठरवले होते. पण संसदेचे अधिवेशन व सातत्यपूर्ण दौऱ्यामुळे ते शक्य होत नव्हते. अखेर संक्रातीचा मुहूर्त साधत अनेक मंत्र्यांची भेट घेतली व तिळगुळ देऊन विकासाबाबत गोड भूमिका देण्याचे आवाहन केले.

सांगली लोकसभा मतदारसंघातील प्राधान्याची विषय काय आहेत, त्यांची सोडवणूक करण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत आणि त्यासाठी राज्य सरकारची कशी मदत लागणार आहे, याबाबत विशाल दादांनी या मान्यवरांशी संवाद साधला. जनहिताच्या काही नव्या कल्पनाही त्यांनी यावेळी मांडल्या. केंद्र सरकारच्या मदतीने भविष्यात सांगलीतील काही महत्त्वकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी राज्य सरकारचे लागणारी मदत त्यांनी बोलून दाखवली व पक्षभेद बाजूला ठेवून सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

यावेळी सर्वच मान्यवरांनी खासदार विशाल पाटील यांच्या या अभिनव कल्पनेचे तसेच त्यांच्या कार्यशैलीचे व संसदेतील अभ्यासपूर्ण भाषणांचे कौतुक केले आणि या ज्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान खा. विशाल पाटील यांच्या या भूमिकेचे सांगलीकर नागरिकाकडूनही कौतुक होत आहे.