yuva MAharashtra बिहारमध्ये उत्खननात आढळले प्राचीन शिव मंदिर !

बिहारमध्ये उत्खननात आढळले प्राचीन शिव मंदिर !


फोटो सौजन्य  - गुगल फोटो गॅलरी

| सांगली समाचार वृत्त |
पाटणा - दि. ९ जानेवारी २०२५
पाटनातील मठ लक्ष्मणपूरमध्ये शिव मंदिर मिळाल्याची माहिती या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या माहितीनंतर या ठिकाणी परिसरातील तसेच आसपासच्या भागातील नागरिकांनी गर्दी केली. यावेळी येथे जमलेल्या लोकांनी भगवान शंकराच्या नावाचा जयघोष करत पूजा आरती सुरू केली. या ठिकाणी बऱ्याच वर्षापूर्वी एक मठ होता. एका कौटुंबिक वादानंतर हा परिसर कचरा फेकण्यात आल्याने तसाच पडून होता. मात्र, ५ जानेवारी रोजी जमीन खचल्याने या

देखील शेअर केला आहे, जो ४७० किमी उंचीवर पृथ्वीभोवती फिरत आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास रशिया, अमेरिका आणि चीननंतर असं करणारा भारत हा चौथा देश ठरेल. शास्त्रज्ञांनी अंतराळात बीजांची उगवण करण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था केली होती. कॅमेरा इमेजिंग, ऑक्सिजन, एन आणि कार्बन डाय ऑक्साईड पातळी, तापमान आणि मातीतील आर्दता यांचे परीक्षण केले गेले.


परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले. या ठिकाणी खोदकाम सुरू करण्यात आले. तेव्हा या ठिकाणी आश्चर्यकारक पद्धतीने एक भव्य आणि कलात्मक शिव मंदिर आढळले. आजुबाजुच्या परिसरातून मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी शिव मंडप मंदिर पहायला गर्दी करू लागलेत. या ठिकाणी लोकांनी शिव मंडप मधील शिवलिंगाची स्वच्छता करून पूजा, आरती सुरू केली. स्थानिक लोकांच्या मते, हा मंडप ५०० वर्षे जुना असल्याचे दिसून येत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या प्लॉटवर काही लोकांनी बेकायदेशीरपणे कब्जा केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर जेव्हा या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली, तेव्हा खोदकामात या ठिकाणी जमिनीतून काळ्या पाषाणात साकारलेलं भव्य शिव मंडप मंदिर समोर आले. स्थानिकांच्या माहितीनुसार, या ठिकाणी अजुनही खोदकाम करण्यात येणार आहे.