yuva MAharashtra महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेत सहभागी होऊन आकर्षक बक्षिसे मिळवण्याचे आवाहन !

महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेत सहभागी होऊन आकर्षक बक्षिसे मिळवण्याचे आवाहन !

फोटो सौजन्य  - गुगल फोटो गॅलरी

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ११ जानेवारी २०२५
ग्राहक रांगेत उभे राहून वेळ व श्रम वाचवण्याबरोबरच पैशाची बचत करीत डिजिटल पद्धतीने वीज भरणा करण्यासाठी कडून वीज ग्राहकांना डिजिटल पद्धतीने वीज बिलाचा भरणा करता यावा यासाठी संकेतस्थळ व मोबाईल ॲप ची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. याद्वारे वीज भरणा केल्यास 0.25 टक्के डिजिटल वीज बिल भरला सूट दिली जाते. परिणामी सध्या 70 टक्के होऊन अधिक वीज ग्राहक ऑनलाईन पद्धतीने वीज भरणा करीत आहेत. परंतु यामध्ये अधिक वाढ होण्यासाठी, ग्राहकांना प्रोत्साहनात्मक महावितरण मार्फत लकी डिजिटल ग्राहक योजना राबवण्यात येत आहे.

१ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन वा तीन पेक्षा अधिक वीज बिले भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे.

ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू (LT Live) वीजग्राहकांसाठी लागू असेल, ज्यांनी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे ०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही किंवा ऑनलाईन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही.


महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे व जून २०२५ या प्रत्येक महिन्यात एक प्रमाणे तीन लकी ड्रा ऑनलाईन पध्दतीने काढण्यात येणार आहेत. प्रत्येक लकी ड्रामध्ये पाच विजेत्यांना स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच ही बक्षिसे दिली जाणार आहेत. योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस इ. ऑनलाईन वीज बिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिने वीज बिल भरणे आवश्यक राहील. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळास www.mahadiscom.in भेट द्यावी, असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे.