yuva MAharashtra महापालिकेचे दीड लाखांचे नुकसान करत, पाळणा ठेकेदाराला भाविकांना लुटण्याचा ठेका - ॲड. ए. ए. काझी

महापालिकेचे दीड लाखांचे नुकसान करत, पाळणा ठेकेदाराला भाविकांना लुटण्याचा ठेका - ॲड. ए. ए. काझी

फोटो - ॲड. काझी फेसबुक वॉलवरुन

| सांगली समाचार वृत्त |
मिरज  - दि. १६ जानेवारी २०२५

मिरज शहरातील ऐतिहासिक मिरासाब ऊरुसासाठी विविध स्टॉल, खेळण्याचे पाळणे, खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात येत असतात. यावेळी महापालिकेतर्फे मिरज हायस्कूल ग्राउंडमध्ये त्यांना लिलाव पद्धतीने जागा उपलब्ध करून देण्यात येते. सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्र, कर्नाटकचा उत्तर भाग किंबहुना देशाच्या विविध भागातून सर्व जाती धर्माचे भाविक मोठ्या प्रमाणावर मिरजेत येत असतात. सहाजिकच येथे विविध प्रकारच्या व्यवसायिकांची स्टॉल साठी मोठ्या प्रमाणात मागणी असते.

मिरज हायस्कूल जागा लिलावात महापालिका अधिकाऱ्यांनी पाळणा चालकांशी संगनमत करून काही जाचक अटी लागू केल्याने अनेकांना ठेका भरता आलं नाही. त्यामुळे ठेक्याची देय बोली 9 लाख 40 होती आणि लिलाव केवळ 10 लाख 50 हजार रुपयांना गेला. दराबाबत अजूनही महापालिका कानावर हात ठेवून आहे. 


मिरज सुधार समितीने 50 रुपये आणि 30 रुपये दर ठेऊन 12 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, खाबूगिरीची लागण झालेल्या अधिकाऱ्यांनी महापालिकेचे दीड लाखांचे नुकसान करत पाळणा ठेकेदाराला भाविकांना लुटण्याचा ठेका दिला आहे, असा आरोप मिरज सुधार समितीचे ॲड. ए. ए. काझी यांनी केला आहे.