yuva MAharashtra यापुढे राज्यात सर्व टोल नाक्यावर फास्ट टॅग अनिवार्य करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय !

यापुढे राज्यात सर्व टोल नाक्यावर फास्ट टॅग अनिवार्य करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय !

फोटो सौजन्य  - गुगल फोटो स्रोत

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ८ जानेवारी २०२५
महामार्गावरील टोलनाके आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा, हे चित्र यापुढे दिसून येणार नाही. कारण सर्व टोल नाक्यावर फास्टटॅग अनिवार्य करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. एक एप्रिल 2025 पासून हा निर्णय लागू होणार असून, तोपर्यंत महामार्गावर प्रवास करणाऱ्या सर्व वाहनधारकांनी आपल्या वाहनांसाठी फास्ट टॅगची सुविधा उपलब्ध करून घ्यावी लागणार आहे.

राज्यातील वाहतूक यंत्रणा गतिमान करण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात 'बांधा वापरा हस्तांतरण करा' या तत्त्वावर महामार्गाचे जाळे निर्माण केले. त्यामुळे सर्वच महामार्गावर काही ठराविक अंतरावर या महामार्गाचा खर्च वसूल टोलनाके निर्माण करण्यात आले. परंतु टोल नाक्यावरील वाहनांची लांब बस लांब रांग, वसुलीचे प्रकार, महामार्गाचा दर्जा यामुळे सुरुवातीपासूनच हे टोलनाके वादाचे कारण बनले. 

मध्यंतरी देशभरातील टोलनाके बंद होणार, टोल वसुलीसाठी साठी सॅटेलाईट द्वारे सुरुवात होणार अशी चर्चा होती. मात्र अद्यापही ना हे टोल नाके बंद झाले ना सॅटॅलाइट यंत्रणा बंद झाली. उलट फास्ट टॅग पद्धत लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. परंतु फास्टट्रॅक द्वारे घेण्यात येणाऱ्या टोल मध्येही अनेक अडचणी निर्माण होत असल्याने, प्रत्येक टोल नाक्यावर बऱ्याचदा वादाचे प्रसंग उद्भवतात. 

महामार्गाची दुर्दशा, टोल वसुलीतील पद्धत, टोल नाक्यावर लांबच लांब रांगामुळे प्रवाशांना होणारा त्रास या साऱ्या घटनांमुळे जनतेतून नेहमीच नाराजी व्यक्त होत असते. अनेकदा टोल नाक्याच्या परिसरातील राजकीय व सामाजिक संघटनांनी आंदोलने ही केली आहेत. आता राज्य शासनाच्या या निर्णयाने त्यामुळे यावर राजकीय व सामाजिक संघटनांची तसेच वाहतूक संघटनांची काय प्रतिक्रिया उमटते हे पाहणे आवश्यक ठरणार आहे.