सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १९ जानेवारी २०२५
महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर होऊन महिना होत आला तरी, सर्वच जिल्ह्यांना पालकमंत्री कोण याची उत्सुकता लागली होती. मात्र यावरून सुरू असलेल्या नाराजी नाट्यामुळे, पालकमंत्री नाट्यावरील पडदा उघडला गेला नव्हता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिग्दर्शकपदाची सूत्रे आपल्या हाती घेऊन पालकमंत्री कोण ? याबाबतची पहिली यादी जाहीर करून पहिला अंक जनतेसमोर आणला.
सांगली जिल्ह्याला उत्सुकता होते ते आपले पालकत्व कोणाकडे जाणार ? याबाबत वेगवेगळे चर्चेचे काथ्याकुट झाले. अनेक नावे समोर आली आणि ती विरलीही. शेवटी शिक्कामोर्तब झाले ते चंद्रकांत दादा पाटील यांच्या नावावर. चंद्रकांत दादांनी यापूर्वी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषवले आहे. दादांचे आणि सांगलीचे तसे जुने नाते. आरएसएसच्या आणि भाजपच्या माध्यमातून दादांनी यापूर्वी अनेकदा जिल्ह्याला झोपते मग दिले आहे. गत विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानही दादांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता नव्याने दादा आणि सांगलीकरांचे नाते दृढ होणार आहे.
सांगली प्रमाणे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून बऱ्याच चर्चा झडल्या. तिथल्या स्फोटक वातावरणामुळे बीडचे पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची संपूर्ण राज्याला उत्सुकता होती. आणि अपेक्षेप्रमाणे सध्या तरी बीडचे पालकमंत्री पद अजित दादांनी स्वतःकडे ठेवले आहे. वातावरण निवडल्यानंतर ते अजित दादांचे जवळचे सहकारी, परंतु सध्या वादाच्या केंद्रबिंदू स्थानी असलेले धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवले जाऊ शकते.
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या बाबतीतही हाच पिता गिरवण्यात आला असून, पालकमंत्री पदी सर्वांच्या अपेक्षा फोल ठरवीत, अनेकांचा पत्ता कट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा व एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेतृत्वाची कसोटी लावत, सध्या बाजी मारली आहे.
विशेष म्हणजे पालकमंत्रिपदाच्या यादीतून मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यंदा प्रथमच सह पालकमंत्री हे पद निर्माण केले असून, मुंबई उपनगर, कोल्हापूर, जिल्ह्यासाठी सह पालकमंत्री पद नेमण्यात आले आहेत.
पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी
1. गडचिरोली - देवेंद्र फडणवीस
2. ठाणे - एकनाथ शिंदे
3. मुंबई शहर - एकनाथ शिंदे
4. पुणे - अजित पवार
5. बीड - अजित पवार
6. नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे
7. अमरावती चंद्रशेखर बावनकुळे
8. अहमदनगर - राधाकृष्ण विखे पाटील
9. वाशिम - हसन मुश्रीफ
10. सांगली - चंद्रकांत पाटील
11. नाशिक - गिरीश महाजन
12. पालघर - गणेश नाईक
13. जळगाव -गुलाबराव पाटील
14. यवतमाळ - संजय राठोड
15. मुंबई उपनगर - आशिष शेलार तर सहपालकमंत्री - मंगलप्रभात लोढा
16. रत्नागिरी - उदय सामंत
17. धुळे - जयकुमार रावल
18. जालना - पंकजा मुंडे
19. नांदेड - अतुल सावे
20. चंद्रपूर - अशोक उईके
21. सातारा - शंभूराज देसाई
22. रायगड - आदिती तटकरे
23. लातूर - शिवेंद्रराजे भोसले
24. नंदूरबार - माणिकराव कोकाटे
25. सोलापूर - जयकुमार गोरे
26. हिंगोली - नरहरी झिरवाळ
27. भंडारा - संजय सावकारे
28. छत्रपती संभाजीनगर - संजय शिरसाट
29. धाराशिव - प्रताप सरनाईक
30. बुलढाणा - मकरंद जाधव
31. सिंधुदुर्ग - नितेश राणे
32. अकोला - आकाश फुंडकर
33. गोंदिया -बाबासाहेब पाटील
34. कोल्हापूर - प्रकाश आबिटकर तर सह पालकमंत्री - माधुरी मिसाळ
35. वर्धा - पंकज भोयर
36. परभणी - मेघना बोर्डिकर