yuva MAharashtra रिजन्सी अनंतम् लावण्यवती महिला मंडळातर्फे हळदीकुंकू व तिळगुळ वाटप समारंभ संपन्न !

रिजन्सी अनंतम् लावण्यवती महिला मंडळातर्फे हळदीकुंकू व तिळगुळ वाटप समारंभ संपन्न !


| सांगली समाचार वृत्त |
डोंबिवली - दि. २० जानेवारी २०२५

रिजन्सी अनंतम् लावण्यवती महिला मंडळातर्फे दिनांक १९-०१-२०२५ रविवारी रोजी मकर संक्रात निमित्ताने आयोजित केलेल्या हळदीकुंकू आणि तिळगूळ समारंभाकरीता महिलांनी भरघोस प्रतिसाद दिला.

ह्या कार्यक्रमातील लक्षवेधक बाब म्हणजे होम मिनिस्टर खेळ आणि मानाची पैठणी. 
मंडळाचे अध्यक्ष सोनाली संदानशिव, सचिव हर्षदा पाठक, सल्लागार अमृता गावडे, सहसचिव प्रियंका आंब्रे, अंजली इंगोले, मीना सावंत, सुमन जैसवाल, योगिता मुलये , सुजाता कोरडे, कृपा मुंज, प्रियंका मदने ह्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली.
 प्रथम कार्यक्रमातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 


श्रीमान स्वपन मिश्रा हयांच्या बहारदार सूत्रसंचालना सोबत मीना सावंत आणि सुमन जैसवाल ह्या दोघींच्या खेळ नियोजनने होम मिनिस्टर हा खेळ खूप रंगला. प्रश्न उत्तरे, उखाणे, कविता, गाणी, लोटपोट हसवणारे विनोद, बच्चे कंपनीने पण उत्साहाने संगीत खुर्ची खेळात भाग घेतला. लकी ड्राॅ कुपन आणि भरभरून बक्षिसे यात ठेवण्यात आलेली होती.
प्रथम सर्व महिलांनी सासर -माहेर ह्या खेळात कौशल्य दाखविले. त्यानंतर फुग्याची आगगाडी, चेंडू गोळा करून बादलीत टाकणे. चिठ्ठी प्रमाणे सौंदर्य सामान घेऊन मुलींना नटवणे. मग शेवटी मोठ्या गोल रिंगण मधून बाटली उचलने असे अनेक खेळ घेण्यात आले.सर्व महिलांनी खेळाचा मनसोक्त आनंद घेतला.



प्राजक्ता लामखडे हया रिजन्सी अनंतम् लावण्यवती महिला मंडळ २०२५ च्या डॉ. संध्या शिंदे ह्यांनी स्पाॅन्सर केलेली पहिली अतिशय सुंदर मानाची पैठणी ची मानकरी ठरल्या. 
इतर खेळातील विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे 
खेळ पैठणीचा- पहिला क्रमांक प्राजक्ता लामखडे, दुसरा क्रमांक रचना हडवले, तिसरा क्रमांक किरण राजपूत.
उखाणे विजेता - अल्का आव्हाड 
लकी ड्रॉ विजेता - योगिता परब, अंकिता नगरकर, हर्षदा पाठक, स्नेहा अय्यर
बाल संगीत खुर्ची विजेता - इरा भडाले, श्रावणी चोपडे, श्रेष्ठ पांडे


श्री. सुहास गावडे ह्यांच्या सहयोगाने प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानिय श्री. राजेश्री मोरे साहेब लाभले. 
शांत संयमी, कार्यसम्राट नेतृत्व आणि सध्याचे शिवसेनेचे विद्यमान आमदार यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले. सौ. अमृता गावडे यांनी त्यांच्याविषयी माहिती सांगितली आणि पुढे खेळ पैठणीचा टप्पा पूर्ण झाला. माननीय राजेश मोरे साहेबांच्या हस्ते सौ. संध्या शिंदे संजीवनी हेल्थकेअर प्रायोजक मानाची पैठणी प्रथम विजेती प्राजक्ता लामखडे ह्यांना देण्यात आली.
अतिथी म्हणून माननीय श्री. जालिंदर पाटील माजी नगरसेवक दावडी ह्यांच्या कडून आलेल्या त्यांच्या भावजय सौ. राधिका पाटील (भाजपा महिला मोर्चा आघाडी अध्यक्ष) ह्यांनी कार्यक्रमासाठी स्वखुशीने स्नॅक्स आणि डेकोरेटर उपलब्ध करून दिले. सौ. इंदिराताई भोईर(उपजिल्हाप्रमुख कल्याण ग्रामीण महिला आघाडी व समाजसेविका, जान्हवी मौर्य (दैनिक तरूण भारत पत्रकार), सौ. विदया कुलकर्णी (माजी मुख्याध्यापिका आणि डोंबिवली टाइम्सच्या कार्यकारी संपादिका महिला पत्रकार ह्यांची उपस्थिती लाभली.
तसेच सोनाली लेदर बुटीक, संजीवनी हेल्थकेअर, श्रीनाथ डेरी, रश्मी फॅमिली सलून यांनी हा कार्यक्रम आयोजित करताना स्पाॅन्सरशिप देऊन सहकार्य केले .

हया कार्यक्रमासाठी हेमंत पाठक, सुहास गावडे, विनित संदानशिव यांची मोलाची मदत मिळाली. असा हा आनंदमयी, भरपूर जल्लोषाने, मान सन्मानाने, सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहाने पार पडला.

बातमी व फोटो सौजन्य - सौ. विद्या कुलकर्णी,
डोंबिवली.