| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ जानेवारी २०२५
आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड मध्ये महापालिकेची सिंगलयुज
प्लॅस्टिकवर कारवाई वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील आणि स्वच्छता निरीक्षक विकास कांबळे , सिद्धांत ठोकळे,
सहायक आयुक्त सचिन सागावकर यांनी ही कारवाई केली.
प्रभाग समिती 03 अंतर्गत कुपवाड येथे सिंगलयुज प्लास्टिक तपासणी जप्ती व दंडात्मक कारवाई मोहीम घेतली. यामध्ये एकूण 15 आस्थापनाची तपासणी करण्यात आली तसेच 5 आस्थापना प्रत्येकी पाच हजार प्रमाणे एकूण 25 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. या मोहीममध्ये वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, स्वच्छता निरीक्षक विकास कांबळे , सिद्धांत ठोकळे, गणेश धोतरे, अंजली कुदळे , मुकदम सागर मद्रासी यांनी सहभाग घेतला.