yuva MAharashtra पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर संपन्न, देवदान प्रतिष्ठानचा उपक्रम !

पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर संपन्न, देवदान प्रतिष्ठानचा उपक्रम !

 

| सांगली समाचार वृत्त |
सांगली  - दि. ७ जानेवारी २०२५

पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त देवदान बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या प्रा. अजिंक्य मोहिते यांच्या वतीने प्रभाग क्र. १ मधील वसंतनगर येथे आयोजित हृदयरोग, अस्थिरोग, मधुमेह, रक्तदाब, डेंग्यू, चिकनगुणिया, कान नाक व घसा इ. वरील मोफत आरोग्य तपासणी व नेत्रतपासणी आणि रक्तदान शिबीराचे उद्घाटन पृथ्वीराजबाबा यांच्या हस्ते झाले. 

यावेळी केक कापून व सत्कार करुन पृथ्वीराजबाबा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सिनर्जी हाॅस्पिटलच्या डॉ. सौ. थोरात व अक्षय ब्लड बँकेचे डॉ. सुलेमान तांबोळी यांचा सत्कार करण्यात आला.या शिबिरात हृदयरोग, अस्थिरोग, मधुमेह, रक्तदाब, डेंग्यू व चिकनगुणीया, नेत्र, नाक कान व घसा इ. रोगाचे निदान व तपासणी करुन वैद्यकीय सल्ला देण्यात आला. 

यावेळी माजी नगरसेवक  किरण सुर्यवंशी, अनिल व अजिंक्य मोहिते,प्रा. एन.डी.बिरनाळे, सुनील व शशिकांत शिंदे, बसाप्पा कोरती,सतीश वाघमारे, सागर खंडागळे, प्रथमेश लोंढे, प्रमोद कदम, विशाल वाडकर, सुरेश पुजारी, प्रविण देवकर, प्रमोद आवळे, स्वप्नील वायदंडे, सनत पाटील, तन्मय पाटील, अभिजित जानकर, विठ्ठल व वैभव थोरात, गौस नदाफ, रोहन खुटाळे,अनिकेत सावंत, निखिल अस्वले, आशुतोष मोहिते, बाजीराव देवकाते, सुभाष तुपे, प्रशांत कांबळे, शांतीसागर व प्रियांका भुसारी, रतन कोरडे, भास्कर धामापूरकर, श्रेयस देवकाते व, आप्पा पवार आणि वसंतनगर, यशवंतनगर परिसरातील कार्यकर्ते व नागरीक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.